Homeबुलढाणा (घाटावर)

चिखली -जालना राष्ट्रीय महामार्गाच्या रोडच्या मधोमध असलेल्या डिव्हाडरमध्ये ठेकेदाराकडून चक्क काळी माती ऐवजी टाकला दगडी मुरुम.देऊळगाव मही जवळील घटना!

 ठेकेदार याची मनमानी

Spread the love

देउळगाव राजा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- चिखली -जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ A चे काम हे २०१८ वर्षांपासून आजही सुरूच आहे.मागील सहा वर्षांपासून रोडच्या रुंदीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असुन राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि काम करणारे कथलिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मनमानीमुळे अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जिव गमवावा लागला.

देऊळगाव मही जवळील वादग्रस्त ठरलेले रोडच्या रुंदी करणाचे काम नुकतेच पुर्ण झाले असताना रोडच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना रोडच्या मधोमध असलेल्या डिव्हाडरमध्ये झाडे लावण्यासाठी असलेल्या जागेत चक्कं ठेकेदाराने दिवसाढवळ्या काळी माती ऐवजी दगडी मुरुम टाकला असुन याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि पदाधिकारी यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.
चिखली-जालना राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी अनियमितता दिसत असुन अनेक ठिकाणी रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असुन अनेक ठिकाणी रोड खराब झाला आहे.तसेच रुंदीकरणाचे काम करताना रोडची उंची वाढविल्याने अनेक रोड लगतच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात उतरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.तसे पाहता राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि पदाधिकारी यांनी रोड लगतच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्याची तसेच पावसाळ्यात रोडवरील पावसाचे पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसणार नाही याची खबरदारी घेत रोड लगत नाली करण्याची जबाबदारी असताना आजही रोडच्या दोन्ही बाजूला नाली झालेली नाही.हे विशेष रोडच्या मधोमध असलेल्या डिव्हाडरमध्ये माती टाकल्याचे समजताच संबंधित ठेकेदार यांना तात्काळ सुचना देऊन दगडी मुरुम काढुन काळी माती टाकण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page