Homeबुलढाणा (घाटाखाली)
महापूर बाधितांना अद्याप मदत नाही
उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत केला रोष व्यक्त
जळगाव जामोद- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात गेल्यावर्षी महापुराचा अनेक घरांना फटका बसला. या महापुरात अनेकांची घरे वाहून गेली, घरगुती साहित्य वाहून गेले.. शासनाकडून वेळोवेळी या संपूर्ण महापूर बाधितांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, लोकप्रतिनिधींनी देखील या गावाला भेटी दिल्या मात्र अद्याप महापूर बाधितांना कुठल्याच प्रकारची मदत न मिळाल्याने संतप्त महापूर बाधितांनी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे. तातडीने या महापूर बाधितांना शासकीय मदत मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे..