बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी दिलेल्या आत्मदहन इशाराचा उपजिल्हाधिकारी यांनी घेतली दखल
उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतली तातडीची बैठक अखेर निघाला बैठकीत तोडगा
सिंदखेडराजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बागायती क्षेत्राची मदत मिळावी म्हणून श्र बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने दखल घेत उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बैठक घेतली अखेर या बैठकीत तोडगा निघाला आहे.
दिनांक १७ जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आत्मदहन अन्नत्याग आमरण उपोषणाच्या अनुषंगाने तातडीची बैठक घेऊन अखेर बैठकीत तोडगा निघाला . बालाजी सोसे, गजानन जायभाये यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. उपजिल्हाधिकारी यांनी ठीक ११ वाजता सोसे व जायभाये यांच्यावतीने बैठकीला शेतकरी व उपजिल्हाधिकारी श्री खडसे साहेब उपस्थित होते
त्यावेळी प्रकाश गीते ,नितीन कायदे, भगवान पालवे ,गजानन मुंडे, रामकिसन नागरे ,विजय घोंगे दिलीप चौधरी ,देवानंद सोसे, अनिल मुंडे ,सुभाष नागरे, छगनराव धायतडक ,गजानन झोरे ,सचिन मुंडे ,संदीप जायभाये संदीप राऊत ईत्यादी मंडळी उपस्थित होती .
या बैठकीमध्ये शेतकरी आणि अधिकारी यामध्ये काहीकाळ खडाजंगी झाली आम्हाला तोंडी आश्वासन नको, आम्हाला मदत देऊ असे आश्वासन नको, कारण हे आंदोलन हे उपोषण सात महिने पूर्ण झाले आता आम्हाला डेड लाईन द्या, तारीख द्या असे त्यावेळेस प्रश्न उपस्थित झाले. त्यावेळेस श्री खडसे साहेब यांनी मीटिंगमध्ये शब्द दिले की 21 तारखेपर्यंत बागायती क्षेत्राची केवायसी यादी अपलोड केल्या जाईल आणि लेखी स्वरुपात 26 तारखेला पिक विमा स्टॅंडिंग क्रोप हार्वेस्टिंग क्रॉप व शेडनेट व इतर मागण्यावर सविस्तर चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला उपस्थित सर्व कृषी विभागाचे सर्व तहसील विभागाचे सर्व सीड्स कंपन्या आणि सर्व पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे अशी त्यांनी त्यावेळेस माहिती दिली तसे लेखी स्वरुपात सुद्धा दिले आणि श्री खडसे साहेब यांनी आता हे आंदोलन थांबवा नक्कीच तुम्हाला मदत मिळेल आणि न्याय मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर संबंधित कृती समितीच्या वतीने ही आंदोलन सध्याचे स्थगित करण्यात आले. दिनांक 28 जून पर्यंत सर्व मार्ग किंवा सर्व प्रश्न मार्गी लागले नाही तर पुन्हा बालाजी सोसे व जायभाये व कृषि समितीच्या वतीने पुन्हा आत्मदहन व अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी पुन्हा एकदा देण्यात आला