Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)

चिखली महसूल चा नकल भागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…

Spread the love

चिखली – आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी-  चिखली महसूल विभागा मध्ये सध्या शेतीचे फेरफार व शालेय विद्यार्थी कागदपत्रे काढण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यां शिक्षणासाठी काही महत्त्वाचे कागद लागत असल्यामुळे चिखली महसूल विभागाच्या नकाल विभाग मध्ये शेतकरी व विद्यार्थी हे जात आहेत तर शेतकरी हे शेती पीक कर्जासाठी घेण्यासाठी लागणारे जुने2016चेआधीचे फेरफार काढण्यासाठी चिखली महसूल नकल विभागाकडे अर्ज करण्यासाठी जातात परंतु चिखली महसूल विभागातील नकल विभागाचे कर्मचारी शेटे हे पावती न देता शेतकऱ्याकडून अमाफ पैसे घेऊन त्यांचा मनमानी कारभार करून शेतकऱ्याकडून व विद्यार्थ्याकडून अमाप पैसे घेतात. शेतकरी आज आसमानी आणि सुलतानी संकटात असतानाच महसूल विभागाचे नकल विभागाचे कर्मचारी सुद्धा शेतकरी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे पावत्या न देता आवाच्या सव्वा पैशाची वसुली करतात त्यांना चलन ची पावती मागितली असता तुम्ही उद्या या आज तुमचे‌ अर्ज घेण्याचे काम होत नाही असे सांगून अर्ज हे अर्जदाराच्या अंगावर फेकून देतात व अपमान स्पध वागणुक देतात आज महसूल विभागामध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचे कागदपत्र काढण्यासाठी महसूल विभाग मध्ये जावे लागते सदर कर्मचारी हे पावती न घेताच विद्यार्थ्यांनी शेतकरी यांच्याकडून अमाप पैसा वसुली करतात जर शेतकरी आणि विद्यार्थी यांचे काम झाले नाही तर विद्यार्थ्यां व शेतकरी हे वेगळं मार्गावर जाण्याची सुद्धा शक्यता आहे .

अंत्री खेडेकर येथील शेतकरी एकनाथ माळेकर हे दिनांक 13 जून 2024 रोजी महाराष्ट्र बँकेचे पिंक कर्ज काढायचे होते म्हणून त्यांनी मेरा खू शिवारातील गट नंबर 243 शेतकरी हे चिखली तालुक्यातील महसूल विभागाच्या नकल भागामध्ये अर्ज घेऊन गेले असता सदर शेटे कर्मचारी यांनी तुमचा फेरफार मिळणार नाही महसूल विभागाच्या तलाठी यांनी त्यांच्या सोयीसाठी कोणतेही फेरफार नंबर टाकून ठेवले आहे तुम्हील फेरफार मिळणार नाही असे सांगितले सदर शेतकरी हा आर्थिक संकटात असल्यामुळे त्यांनी विनवणी केली असता सदर शेतकरी यांनी चलनाची पावती घेण्यासाठी सादर कर्मचारी शेटे यांच्याकडे चाळीस रुपये सुद्धा दिले त्यांनी ते पैसे घेवुन खिशात घातले आणि झेरॉक्स आणण्यासाठी बाहेर पाठवले सदर अर्जाची झेरॉक्स घेऊन शेतकरी आले असता या कामाचे मला दीडशे रुपये लागतील असे सांगितले सदर शेतकरी यांनी चलावनची पावती मागितले असता सदर कर्मचारी यांनी तुम्ही उद्या या आणि अर्ज हा अंगावर फेकून दिला सदर शेतकरी यांनी महसूल विभागाच्या नकल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दीडशे रुपये दिले असते त्यांनी अर्ज ठेवला परंतु कोणत्याही प्रकारची चलावन ची पावती दिली नाही कास्तकार हा विनवणी करून सुद्धा त्यांनी त्याच्यावर 26 जुन 2024 ची तारीख टाकून झेरॉक्स पावती सदर शेतकरी यांना दिली दिली सदर शेतकरी हा विनवणी करत असतानाच साहेब पेरणी पाण्याचे दिवस डोक्यावर आहेत मला जर लवकर फेरफार मिळाला तर मला बँक कर्ज देईल नाही तर माझी शेती ही कर्ज मिळाले नाही तर पडीत राहील अशी विनवणी करून सुद्धा सदर कर्मचारी शेटे यांना कोणतीही दयामाया आली नाही त्यांनी उलट शेतकरी यांनी पावती मागितले तर कुठेही जा माझ्याकडे पावती नाही झेरॉक्स वर दीडशे चा आकडा लिहून झेरॉक्स परत दिली सदर महसूल विभागाच्या नकल विभागाच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारची दया माया आली नाही अंत्री खेडेकर येथील शेतकरी यांना माहिती मिळाली की चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार महोदया श्वेताताई महाले पाटील या चिखली महसूल विभागामध्ये खरीप पेरणीच्या आढावा बैठकीसाठी महसूल विभागामध्ये आहे सदर शेतकरी हे महसूल विभागामध्ये गेले असता आमदार महोदया मीटिंग आटपून नेमक्या बाहेर येत होते त्यावेळेस अंत्रीखेडेकर येथील शेतकरी एकनाथ माळेकर यांनी आमदार महोदयांची भेट घेतली असता आमदार मोहदया यांनी ताबडतोब चिखली महसूल चे न्याय दंड अधिकारी काकडे साहेब यांना सदर प्रकाराबद्दल माहिती दिली चिखली महसूल चे तहसीलदार यांनी नकल विभागाचे कर्मचारी शेटे यांना बोलून चिखली महसूल नकल विभागामध्ये काय प्रकार सुरू आहे. शेतकरी आणि चिखली विधानसभेचे आमदार श्वेता ताई महाले पाटील तहसीलदार व इतर शेतकरी यांच्यासमोर हा प्रकार काय विषय आहे या याबाबत विचारणा केली असता सदर कर्मचाऱ्याजवळ कोणत्याही प्रकारचे उत्तर नव्हते या अगोदर सुद्धा नकल विभागाच्या भरपूर तक्रारी आमदार महोदया कडे आलेले आहे या अगोदर सुद्धा वेळोवेळी सांगून सुद्धा सदर कर्मचारी हा वागणूक सोडत नाही हे बरोबर नाही अशी नाराजी चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली न्याय दंडाधिकारी यांच्याकडे बोलून नाराज व्यक्त केली आहे आज विद्यार्थी आणि शेतकरी यांना महसूल विभागाचे आनेक कागदपत्रे लागतात आणि आपले कर्मचारी अमाप पैसे घेऊन जर काम करत असतील तर हे बरोबर नाही असे सांगून आमदार महोदया श्वेता ताई महाले यांनी नाराजी व्यक्त केली आहे सदर शेतकरी महसूल मंत्री व महसूल आयुक्त यांची लवकरच भेट घेऊन चिखली महसूल विभागातील नकल विभागाचे कर्मचारी यांचा सावळा गोंधळाची कैफियत मंत्र महोदयाजवळ माडणारा आहेत जर हा सावळा गोंधळ बंद झाला नाही तर सदर शेतकरी 15 ऑगस्ट 24 रोजी जिल्हा अधिकारी बुलढाणा कार्यालय समोर उपोषण करणार आहे

चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी मी शेतकरी यांच्या सोबत आहे असे सांगितले आहे चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये मी कोणत्याही विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यावरील अन्याय सहन करून घेणार नाही आमदार महोदय यांनी सदर मीटिंग दरम्यान ठणकावून सांगितले आहे . सदर शेतकरी यांनी चिखली न्याय दंडाधिकारी काकडे साहेब यांना विचारले असता आपले किती कर्मचारी आहेत नकल विभागांमध्ये त्यावेळेस त्यांनी दोन ते तीन कर्मचारी आहेत असे सांगितले परंतु नक्कल भाविकांमध्ये आठ ते दहा दलाल सक्रिय असल्याची सुद्धा समोर आली आहे सदर दलाल यांना पाचशे ते हजार रुपये दिले असता ताबडतोब तुमचे नकल्याचे कागदपत्र मिळतात अशी सुद्धा चिखली तालुक्यामध्ये चर्चा आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page