Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)

हिवरा आश्रम येथे चोरट्यांनी तीन घरे फोडून हजारो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

Spread the love

 

हिवरा आश्रम- ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरा आश्रम येथे अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना हिवराश्रम येथील येथील वार्ड क्रमांक चार मधील तीन घरे असलेले या ठिकाणी घडले आहे या गावात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून दोन दिवसाआधी लाखोचा ऐवज लंपास केला होता. आता झालेल्या चोरीमध्ये घरासमोरील मोटारसायकल सुध्दा चोरट्यांनी लंपास केली आहे. साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक चार मधील शेख अक्रम शेख कासम , सचिन तानाजी सोळंके , आणि लखन संजय कामे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला . घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील सोन्याचा पट्टा १ हजार , मणी १ हजार २०० रुपये , गंठण २५ हजार रुपये , चांदीचे पैजन १ हजार रुपये व इतर ५०० रुपये साहित्य आणि नगदी १२ हजार असा ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.शेख अक्रम यांच्यासह तिघांच्या फिर्यादीवरून साखरखेर्डा पोलिसांनी १७ जून रोजी रात्री अज्ञात आरोपी विरोधात कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे काॅ . बाजीराव खरात करीत आहेत. चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने साखरखेर्डा पोलीस यांनी या गोष्टीकडे गांभीर्त्याने लक्ष देण्याची गरज आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page