डिडोळ्यातील 21 वर्षीय तरुणाच्या हत्याप्रकरणी मूकनायक फाउंडेशन च्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन
दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- मलकापूर तालुक्यातील डिडोळा या गावात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची धरणगाव या ठिकाणी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 21 वर्षे मुलाचे वडील यांनी मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार यांच्याकडे याप्रकरणी माहिती दिली सतीश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले व अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांना निवेदन दिले या निवेदनामध्ये दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मूकनायक फाउंडेशनच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे येत्या सात दिवसाच्या आत कारवाई न केल्यास तीव्र व व्यापक स्वरूपाचे आंदोलन संविधानिक मार्गाने करण्यात येईल असा इशारा मूकनायक फाउंडेशन च्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. याप्रसंगी मृतक दीपक सोनवणे यांचे कुटुंबीय तथा समस्त गावकरी यांच्यासह मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पवार, बाला राऊत, अर्जुन खरात, सतीश गुरचवळे, ऍड.एस.एस. सुरडकर व इतर पदाधिकारी बहुसंख्याने या ठिकाणी उपस्थित होते.