एन.डी. आर. एफ. पुणे येथील पथक जिल्ह्यात दाखल
आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्ह्यात देणार प्रशिक्षण....
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा , राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल 5Bn, NDRF पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १८/०६/२०२४ ते ३०.०६.२०२४ पर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 18 जून 2024 रोजी जिल्हा पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे पोलीस विभागातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे दिनांक 19.06.2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यातील नियोजन भवन येथे जिल्हा शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्या करिता मा.डॉ किरण पाटील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,बुलढाणा यांचे आदेशानुसार व मा.श्री.निर्भय जैन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा यांचे सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाकरिता तहसीलदार सामान्य प्रशासन श्रीमती संजीवनी मुपडे व तहसीलदार माया माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. संभाजी पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बुलढाणा हे होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता महसूल सहाय्यक के. एस. जाधव व सांडू भगत व ऑपरेटर विष्णू बारस्कर यांचे सहकार्य लाभले. ..त्याचप्रमाणे दि. 24.06.2024 ते 28.06.2024 पर्यंत
उपविभागीय स्तरावरील तालुक्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात पूर, विज, आग, रस्ते अपघात, सर्पदंश या विषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे .सदर प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक ,NDRF टीमचे पुणे येथील पोलीस निरीक्षक, जालिंदर फुंदे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व सर्व Ndrf पुणे, येथील टीमचे सदस्य हे प्रशिक्षण देणार आहे.
सदर प्रशिक्षणाला तालुक्यातील आपत्तीप्रवण गावातील सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक/सेविका, व विविध विभागाचे कर्मचारी,तहसील कार्यालयाचे कर्मचारी, तसेच तालुकास्तरीय शोध व बचाव पथकातील सदस्य यांना प्रशिक्षण देणार आहे.