जाभोरा शिवारात अवैध रेती वाहतुक करतांना टिप्पर पकडले

सिंदखेड राजा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- सिंदखेड राजा तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु आहे अवैध रेती वाहतुक करतांना तलाठी यांनी आज तारीख२० जुन रोजी एक टिप्पर पकडून किनगांव राजा पोलीस स्टेशनला अटकाव करण्यात आले आहे याबाबत साविस्तर वृत्त असे की आज दि. २०/०६/२०१४ रोजी जांभोरा गावानजवळील वाहन क्रं. MH 28 B Q 2757 टिप्पर हे रेती वाहतुक करतना निदर्शनास आले असुन सदर वाहन, हात इशाऱ्याने थांबीवले असता, सदर वाहनात ०१ ब्रास रेतीआढळून आली वाहन चालकाकडे रेतीपरवाना बाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे परवाना नसल्याचे वाहन चालक विष्णु गायके यांनी सांगीतले सदर वाहणान एक ब्रास रेती होती यावेळी सदर गाडीचा पंचनामा तलाठी किनगांव राजा तलाठी विझोरा तलाठी दुसरबिड तलाठी जऊळका यांनी पंचनामा करून सदर वाहन किनगाव राजा पोलीस स्टेशनाला अटकाव करण्यात आले आहे