कापसाला 59 हजार रुपये विमा संरक्षण
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील सर्वसमावेशक पीक विमा योजनेत खरीप हंगाम सन 2024-25 साठी एक रूपयांत विमा काढण्यात येत आहे. अतिवृष्टी, वादळ, पूर, पावसातील खंड, काढणी पश्चात नुकसान या संकटापासून पिकांना केवळ एक रूपयात विम संरक्षण प्राप्त होणार आहे. यात कापूस पिकाला सर्वाधिक 59 हजार 983 रूपये प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सर्वसमावेशक पीक विमा योजनेतून खरीप हंगाम सन २०२४-२५ साठी मुग पिकाला २५ हजार ८१७ रूपये, उडीद पिकाला २६ हजार २५, ज्वारी पिकाला ३२ हजार १२५, सोयाबीन पिकाला 55 हजार 500, मका पिकाला ३५ हजार ५९८, कापूस पिकाला ५९ हजार ९८३, तर तूर पिकाला ३६ हजार ८०२ रूपये पिकविमा केवळ एक रूपयात प्राप्त होणार आहे.पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई लिमीटेड नियुक्त करण्यात आली आहे. यासाठी सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, पीक पेरा, स्वयं घोषणापत्र ही कागदपत्र आवश्यक आहेत. हा विमा जन सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र याठिकाणी भरता येणार आहे. विम्याबाबत अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.