वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने विधवा महिलांच्या सन्मानार्थ सुहासिनी महिलांनी घेतली शपथ…

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- आज वटसावित्री पौर्णिमा आहे, त्या निमित्ताने सुवासिनी महिला आपल्या पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात, परंतु बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावामध्ये याच दिनाचे औचित्य साधून परंपरेला फाटा देत सुहासिनी महिलांनी विधवा महिलांच्या सन्मानार्थ एक शपथ घेतली आहे.. पतीच्या निधनानंतर महिलांना बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, कुंकू पुसणे ह्या सर्व प्रथा बंद करून त्यांना प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी शपथ सुवासिनी महिलांचा गावातील पुरुष मंडळींनी घेतली आहे.. त्याचबरोबर यावेळी सुवासिनी महिलांनी स्वतः कुंकू लाऊन वटवृक्षाची पूजा केली आहे, त्यामुळे ही विधवा महिलांच्या सन्मानार्थ परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल…