सामाजिक जनजागृती अभियान’ची आळंदीतुन सुरुवात

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता, शेतकरी समस्या, महागाई, भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करण्याबाबतचे सामाजिक जनजागृती अभियान पोस्टरचे प्रकाशन आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲडोकेट.राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे माऊलींच्या समाधी मंदिरात झाले आहे.लोणार तालुक्यातील किनगाव जटू येथील युवक सचिन नागरे यांनी हे सामाजिक जनजागृती अभियान राज्यभरात राबविण्याच्या निर्णय घेतला असून बनवलेल्या पोस्टरच्या माध्यमातून ते जनतेमध्ये विविध विषयांवर जनजागृती करित आहे. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता, शेतकऱ्यांच्या समस्या, महागाई व भ्रष्टाचार, बेरोजगारी आदी समस्यांबाबत जनजागृती केली जात आहे.एकुण चार टप्प्यात ही जनजागृती केली जाणार आहे. पहिला टप्पा एक जून ते १५ जुलैपर्यंत आहे. यामध्ये युवकांना जोडणे, वृक्षारोपण करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती केली जाणार आहे तसेच नागरिकांचा अभिप्रायही घेतला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १५ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान ठराविक गावांना भेटी देऊन तिथल्या समस्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा करणे, घरोघरी वृत्तपत्र सुरू करण्यासाठी जागृती, ग्रामपंचायत योजना, निधीबाबत गावकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. तसेच तिथल्या सामाजिक संस्थांचा परिचय करून घेतला जाणार आहे.तिसऱ्या टप्प्यात एक सप्टेंबर ते १५ आक्टोबरमधे सरकारी अधिकाऱ्यांची भेट, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्यासारख्यांच्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात १५ आक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान सामाजिक बांधिलकी असलेल्या संस्थांना भेटी देणे, जनसंपर्क वाढवणे असा उपक्रम असणार आहे. वारकरी संप्रदायाच नव्हे तर सर्व शासकीय व नियमशासकीय संस्था यांच्या माध्यमातूनही अशा विषयांवर जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सचिन नागरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, लेखक, साहित्यिक, अधिकारी यांनी यांच्या उपक्रमाचे कौतुक केले असून राज्यातील ग्रामपंचायती नगरपरिषद, महानगरपालिका यांनी सुध्दा अशा उपक्रमास प्रोत्साहन देऊन सामाजिक जनजागृती परिसरात करावी अशी अपेक्षा नागरे यांनी व्यक्त केली आहे. यासाठी शासनस्तरावर सहकार्य मिळावे अशी मागणी सुध्दा त्यांनी मुख्यमंत्री महोदय यांना ईमेल व्दारे केलेली आहे असेही कळविण्यात आले आहे.