राजे गार्डन येथे योग दिवस साजरा
निरोगी आरोग्यासह सामाजिक स्वास्थ्य जपण्याचे आवाहन

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) विद्यावर्धिनी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने राजे गार्डन येथे योगदिन साजरा करून योगसाधनेने सर्वांचेच लक्ष वेधले होते. यावेळी निरोगी आरोग्यासह सामाजिक स्वास्थ्य जपण्याचे आवाहन करण्यात आले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युनो’च्या व्यासपीठावरून सर्व जगाला आवाहन केले आहे. जगात सुख, शांती नांदायची
असेल, तर भारतीय परंपरेतून आलेल्या योगाचा अभ्यास जगभर झाला पाहिजे. या विषयाकडे जगाचे लक्ष केंद्रित व्हावे म्हणून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे त्यांनी आवाहन केले आणि 100 हून देशांत गेल्या 8 वर्षांपासून 21 जून हा दिवस जागतिक म्हणून साजरा होत आहे. या निमित्ताने चैतन्यवाडीत योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनाचे औचित्य साधून बुलढाणा येथील विद्यावर्धिनी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. उमेश सांखला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक राजे गार्डन, चैतन्यवाडी बुलढाणा येथे एक दिवसीय योग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमास उपस्थित राहून योगसाधना केली व उपस्थितांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अनमोल देण असून ती मानवी शरीरा सोबतच सामाजिक स्वास्थ्य सुव्यवस्थित राखण्यासाठी आवश्यक असल्याचा” भावना व्यक केली.
या शिबिरात जिजामाता महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री डी एम अंभोरे सर, भाजपा कार्यकारीनी सदस्य श्री दिपकजी वारे, कामगार मोर्चा प्रदेश प्रतिनिधी श्री अण्णासाहेब पवार, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री दत्ता शिंदे, भाजपा जिल्हा सचिव श्री दत्ता पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. स्मिताताई चेकेटकर, श्री अनंता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोरसे, सौ सौ शोभाताई ढवळे आदि मान्यवरांसह असंख्य नागरिकांनी तसेच संस्था परिवारातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद यांनीही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.