Homeबुलढाणा (घाटावर)

दहा दिवसातून एकदा स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास नगरपालिकेला कुलूप लावू – डॉ. गोपाल बछिरे   

१८ दिवस उलटून सुद्धा अद्याप पाण्याचे रिपोर्ट नगरपरिषदेस प्राप्त झालेले नाही

Spread the love

लोणार – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : नगरपरिषदेने किमान दहा दिवसातून एकदा स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास नगर परिषदेस कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व नगरसेवक गजानन जाधव यांनी लोणार न.प. मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला. जागतिक दर्जाचा पर्यटन स्थळ असलेलं लोणार शहराला महिन्यातून एकदा दूषित, दुर्गंधीयुक्त व पिवळ्या रंगाचे पाणी जे पिण्याजोगे नाही असा अहवाल मुख्य अणुशास्त्रज्ञ बुलढाणा यांनी १२ डिसेंबर २०२३ व ८ फेब्रुवारी २०२४ ला दिलेला आहे असे असताना देखील नगर परिषद दूषित पाणी नळ योजनेद्वारे सर्वसामान्यांना पिण्यासाठी पुरवले जातो म्हणून डॉ. बछिरे यांच्या तक्रारी नंतर विभागीय आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी जोग यांच्या माध्यमाने दि. ७ जून रोजी पाण्याचे नमुने घेऊन मुख्य अनूजीवशास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांच्याकडे तपासणीस पाठविले होते. त्यानंतरही नळाद्वारे सोडलेले पाणी हे दूषित, दुर्गंधीयुक्त व पिवळ्या रंगाचे आहे जल शुद्धीकरण यंत्र हे शोभेची वस्तू झाली आहे. जलशुद्धीकरणांमध्ये लागणारी रेती ही तीन वर्षापासून खरेदीच करण्यात आलेली नाही किंवा जलशुद्धीकरण प्रकल्पात रेती टाकण्यात आलेली नाही म्हणून १८ दिवस उलटून सुद्धा अद्याप सदरील पाण्याचे रिपोर्ट नगरपरिषदेस प्राप्त झालेले नाही किंवा मुख्य अणू जीवशास्त्रज्ञ यांनी मुख्य अधिकारी नगरपालिका लोणार यांचा बचाव करण्यासाठी सदरील पाण्याचा रिपोर्ट पाठविलेला नाही अथवा सदरील पाणीच प्रयोग शाळेत घेतलेही नसावे असा आरोप डॉ. बछिरे यांनी मुख्याधिकार्‍यावर केला आहे.लोणार येथील जलशुद्धीकरण केंद्र ही शोभेची वस्तू झालेली आहे येत्या ८ दिवसात जलशुद्धीकरण यंत्र पूर्ण तया दुरुस्त करावे त्यात शुद्धीकरणासाठी लागणारी रेती आणून टाकावी व दहा दिवसातून एकदा शुद्ध पिण्याजोग पाणी नळ योजनेद्वारे शहरवासीयांना देण्यात यावे अन्यथा आठ दिवसानंतर नगर परिषदेच्या इमारतीला कुलूप ठोकून नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यावर संविधानाचे अनुच्छेद २१ म्हणजेच मानव मौलिक अधिकाराचे उल्लंघन व सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे नगरसेवक तथा शहर प्रमुख गजानन जाधव यांनी लोणार न.प.मुख्य अधिकाऱ्यांना दिला याप्रसंगी सुदन अंभोरे, परमेश्वर दहातोंडे, तेजराव घायाळ, राजू बुधवत, गणेश पाठे, अजय बछिरे, किरण कमडे, कृष्णा बछीरे प्रसेनजित बछीरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page