पावसाळा लागला मात्र आरोग्य आले धोक्यात
चक्क 44493 घरांमध्ये आढळल्या डासअळ्या 30 रुग्ण डेंग्यूचे तर 12 चिकनगुनियाचे रुग्ण

बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- पावसाळा हा नुकताच लागला आहे मात्र आरोग्यही धोक्यात आले आहे.घर व परिसरात स्वच्छता न ठेवल्याने डासांची पैदास होते. बुलढाणा जिल्ह्यातील अशा 556146 घरांची तपासणी करण्यात आली असून, तब्बल 44493घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. गंभीर बाब म्हणजे 30 रुग्ण डेंग्यूचे तर 12 रुग्ण चिकनगुनियाचे आढळून आल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
जानेवारी ते मे 2024 पर्यंत जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत 482 संशयित रक्तजल नमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये 30 रुग्ण डेंग्यूचे आढळून आले.12 रुग्ण चिकनगुनियाचे आढळून आले आहे. या मोहिमे अंतर्गत 13 शहरांमध्ये आणि 52 प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत 596146 घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 44493 घरांमध्ये डासअळ्या आढळून आल्या.17784159 घरातील भांडी तपासण्यात आली. पैकी 138115 भांड्यांमध्ये डासअळ्या आढळून आल्या. दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू,मलेरियासह साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.त्यासाठी आरोग्य विभाग ‘अलर्ट’ झाला असून, शहरात डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये धडक विशेष मोहीम राबविल्या जाणार आहे. त्यासाठी 7 शहर व 40 गावांमध्ये 148 आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक गठीत करण्यात आले असून कीटक शास्त्रीय सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये 42 आरोग्य पर्यवेक्षक काम पाहणार आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी व हिवताप अधिकारी काय म्हणतात?
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते आणि जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान यांनी आवाहन केले की,डासांची पैदास होऊ नये म्हणून घरात पाणी साठविण्याची सर्व भांडी घासून कोरडी करावीत, त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे.
■ रिकामी करता येणे शक्य नाहीत, अशा मोठ्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावे.
■ घरातील फ्लॉवर पॉट,
कूलर व फ्रीजच्या खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्याला फेकून द्यावे.
■ घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवरील भंगार
मालाची विल्हेवाट लावावी.
■ घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवावीत.
■ शौचालय आणि ड्रेनेजच्या व्हेंट पाइपला जाळ्या बसवाव्यात.
▪️ आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा
डासांची पैदास होऊ नये म्हणून घरात पाणी साठविण्याची सर्व भांडी घासून कोरडी करावीत, त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे.
■ रिकामी करता येणे शक्य नाहीत, अशा मोठ्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावे.
■ घरातील फ्लॉवर पॉट,
कूलर व फ्रीजच्या खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्याला फेकून द्यावे.
■ घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवरील भंगार
मालाची विल्हेवाट लावावी.
■ घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवावीत.
■ शौचालय आणि ड्रेनेजच्या व्हेंट पाइपला जाळ्या बसवाव्यात.