Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

जळगांव जामोद सह बहुजन मुक्त्ति पार्टी संपूर्ण ताकादीने लढविणार बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा- श्रीकांत होवाळ

Spread the love

बुलढाणा: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- आज बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन मुक्ती पार्टीची कार्यकर्ता बैठक बोलावण्यात आली होती.

ही बैठक बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशध्यक्ष अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार्टीची जिल्हा स्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला जिल्हयातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पार्टीचे संघटन वाढ विस्तार व उत्कृष्ट पद्धतीने रस्त्यावरची आंदोलनं यशस्वी केलीत त्यामुळे जिल्हयातील सातही ( बुलढाणा, मलकापूर, जळगांव जामोद, खामगाव, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा) विधानसभा निवडणुक संपूर्ण ताकतदिने लढवणार असल्याची माहिती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ यांनी मार्गदर्शन करतांना स्पष्ट केले व संपूर्ण ताकदिने कामाला लागा असे आदेश सुध्दा यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आले.

या देशातील शासक वर्गाने स्वातंत्र्याचे ७६ वर्षा नंतर सुध्दा अठरा पगड जातींच्या लोकांच्या समस्या सोडविल्या नाहीत. म्हणूनच बहुजन मुक्ती पार्टी मैदानात उतरली आहे असे प्रतिपादन पार्टीचे प्रदेश प्रभारी प्रताप पाटील यांनी केले.यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव सुजित बांगर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एजाज शहा भारत मुक्ती मोर्चाचे विभागीय अध्यक्ष भागवत जाधव पिछडा (ओबीसी) वर्ग मोर्चाचे गोपाल वाघमारे बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या विदर्भ कोषाध्यक्ष संध्या हिवाळे , प्रकाश धुरंधर, महेंद्र गवई, इम्रान खान, प्रवीण गवई, अंकित भारसाकडे, जया उजागरे, लता खिल्लारे, रत्नाताई इंगळे, प्रीतीताई धुरंधर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्यातील कार्यकर्तेही या बैठकीस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page