लोणवडी येथील १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मलकापूर – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी (करण झनके) तालुक्यातील लोणवडी येथील १२ वर्षीय चिमुकल्याची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना २६ जून बुधवार रोजी घडली.
लोणवडी येथील चि. अथर्व नितीन खर्चे (वय १२ वर्ष) याचे दोन दिवस अगोदर पोट दुखत होते. अचानक उलट्या झाल्या म्हणून अथर्वला दवाखान्यात दाखल केले. रक्त व लघवीची तपासणी केली मात्र त्यामध्ये सर्व रिपोर्ट निरंक आले. मात्र दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला परत
दवाखान्यामध्ये हलविण्यात आले. मात्र त्याला काळ्या पाण्याची उलटी झाली अन् कुटुंबीय एकदम घाबरून गेले व त्यांनी तातडीने उपचारासाठी धावपळ केली. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि अथर्व याचा मृत्यू झाला. अथर्वच्या रक्ताच्या चाचण्या सर्व निरंक असूनही त्याचा मृत्यू कसा झाला हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्याला काळ्या पाण्याची उलटी झाल्याने विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नितीन खर्चे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून एकुलत्या एक मुलाचा मृत्यू मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.