जि.प.प्रा.शेलोडी शाळेचे पहिले पाऊल उत्साहात…
शाळा व्यवस्थापन समितीने काढली विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक..

चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी(राजेंद्र घोराडे): उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून सुरू होत असलेल्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देत आणी शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता पहिलीच्या प्रवेश पात्र चिमुकल्यांचे बैलगाडीतून फेरी काढून व औक्षण करून जिल्हा परिषद शाळा,शेलोडी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फ उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असतांना, आणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिकवण्यात कमी पडत असतांना,जी.प.शाळा शेलोडी येथील पटसंख्या मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे,यामागे शेलोडी येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील जागरूक युवक यांची आपली शाळा सुंदर करण्याचा चंग त्याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची मेहनत असल्याचे गावकरी आनंदाने व अभिमानाने सांगतात.
यावर्षीसुद्धा जि.प.म.उच्च प्राथमिक शाळा शेलोडी येथे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे व शाळेत वेगवेगळ्या वर्गामध्ये नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्द्तीने स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी सजवलेल्या बैलगाडी मधून भव्य दिव्य विद्यार्थी मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी शेलोडी शाळेतील सर्व शिक्षक , विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती व पालक अंतकरणापासून सहभागी झाले होते.या प्रसंगी इयत्ता पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प तसेच पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले …
या कार्यक्रम प्रसंगी शेलोडी गावचे प्रथम नागरिक सरपंच समाधान रिठे, सर्व ग्रामपंचायत सदस्य , शाळा समिती अध्यक्ष राजु भाऊ नेमाने, उपाध्यक्ष सोपन घाडगे , शिक्षक तज्ञ तुळशीदास रसाळ, संभाजी जाधव, किसन शेवाळे, संतोष बनसोडे लक्ष्मण गायकवाड, कैलास घाडगे, ज्ञानेश्वर बनसोडे, ज्ञानेश्वर वाळसाकर, भागवन तावरे ,अमोल नेमाने ,तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष रामधन शेवाळे ,गावातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते..