मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी!

सिंदखेडराजा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – प्रतीक सोनपसारे:- शासनाची मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना राज्यात दाखल होतात राज्यभरात महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे कागदपत्र तयार करण्यासाठी महिला या आता घराबाहेर पडल्या आहेत सर्वत्र ठिकाणी सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे सिंदखेड राजा शहरात सरकारी दवाखान्याजवळ असलेल्या महा ई सेवा केंद्रांवर रस्त्यापर्यंत महिलांच्या रांगा लागल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे १ जुलैपासून पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे राज्य सरकार महिलांना दरमहा १५०० रुपये देणार आहे त्या साठी वयाची अट २१ ते ६० वर्षापर्यंत महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे.