सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे वृक्षारोपण सोहळा संपन्न

बुलढाणा:- आपला बुलढाणा जिल्हा बातमी- प्रतिनिधी राजेंद्र घोराडे:- स्थानिक स्व. श्रीमती बसंतीबाई देवकीसनजी चांडक सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे दि.४ जुलै 2024 रोजी आदरणीय भाईजींच्या प्रेरणेतून, आदरणीय सुकेशजी झंवर साहेब व सौ कोमलताई झंवर यांच्या मार्गदर्शनाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे | वनचरे || या संत शिरोमणी तुकोबारायांच्या ओविंना सार्थ ठरवीत आ. भाईजी यांची संकल्पना वसुंधरा” आम्ही तुझे अपराधी.. यामाध्यमातून 2600 देसी वृक्ष ज्यामध्ये वड, पिंपळ, लिंब , जांभूळ, चिंच , आंबा, सीताफळ व इतर वृक्ष वाटप करण्यात आले.आ. भाईजी बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून वृक्ष लागवडीचा पावन विचार सर्वत्र राबवित आहेत. वृक्षरोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाचे अनेक सामाजिक उपक्रम बुलडाणा अर्बन परिवाराद्वारे दरवर्षी सातत्याने राबविले जातात. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या वेळी. याप्रसंगी स्थानिक संचालक श्री अनंतराव सावळे ,बबनराव उजेड ,बबनलालाजी गाडगे (सरपंच), व इतर संचालक मंडळ त्यांचे सर्व शिक्षक वृद तसेच विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री राजेंद्र वानेरे साहेब शाखा डोंगर खंडाळा शाखा व्यवस्थापक अनिल देशपांडे साहेब व कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता महाविद्यालयाचे प्राध्यापक,शाळेचे शिक्षक वृंद, इतर कर्मचारी चे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.वृक्ष लागवड करून महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्ष भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षाचे उपयोग सांगून वृक्षरोपणाचे महत्त्व विशद करण्यात आले.