Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)
जयस्तंभ चौकात आढळून आले अज्ञात व्यक्तीचे मृतदेह

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी बुलढाणा शहरातील मुख्य जयस्तंभ चौकात बुलढाणा अर्बन बँक समोर रस्त्यालगत अंदाजे 60 ते 65 वर्षीय वयाच्या अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासातून वृद्धाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या हा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आला असून बुलढाणा शहर पोलिसांनी आव्हान केले आहे की सदर मृतदेह ओळखीचा असल्यास बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला कळवावे.