Homeजिल्‍ह्याचे राजकारणबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

बुलढाणा जिल्ह्यातील 6 विधानसभा निवडणुका लढविणार:- रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात सुद्धा उमेदवार उभे करणार

Spread the love

 

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांचा पराभव झाला असला तरी मात्र पराभवाला न जुमता ते परत एकदा नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे बुलढाणा येथे गोलांडे लॉन्स या ठिकाणी कार्यकर्त्यांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते निर्धार नव्या लढाईचा असा संदेश देत रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जनतेला त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तुपकर यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतले आपण विधानसभा निवडणूक ही कोणत्या मतदारसंघातून निवडावी यासाठी कार्यकर्त्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि रविकांत तुपयांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी ही सुद्धा आपापल्या पद्धतीने सांगितले. बुलढाणा लोकसभा निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक दिसून आली कारण एक अपक्ष उमेदवार यांनी अडीच लाख मतदान घेतले आहे आजपर्यंत कुठल्याही अपक्ष उमेदवाराला एवढे मतदान मिळाले नाही हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर यांना मिळाले आहे. आता थांबायचं नाही भाऊ विधानसभा निवडणूक सुद्धा लढाईची आणि ती विजयी सुद्धा करायची असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते यावेळेस या बैठकीला हजर होते काही कार्यकर्ते सिंदखेडराजा विधानसभेतून तर काही कार्यकर्त्यांनी चिखली तर काहींनी बुलढाणा विधानसभा तर काही कार्यकर्त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी असा सुद्धा आग्रह यावेळी धरला तर काही कार्यकर्ते म्हणे भाऊ आपण एखाद्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवावी असे मत सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात आले अखेर बैठकीच्या शेवटी रविकांत तुपकर यांनी सर्व कार्यकर्त्यांची मते विचारात घेत मोठी राजकीय घोषणा सुद्धा केली आहे.

रविकांत तुपकर यांच्या भाषणाआधी विविध कार्यकर्त्यांनी आपले मते व्यक्त केले.आपली ही लढाई विस्थापितांची लढाई आहे सगळ्यांनी आपले मनमोकळेपणाने मत बोलावे तुमची मत लक्षात घेता यावी झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाता यावा यासाठी आपण या बैठकीचे आयोजन केले आहे रविकांत तुपकर यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितले ही लढाई तुमच्यामुळे इथपर्यंत आली. आता विधानसभेची लढाई सुद्धा मोठ्या ताकतीने पुढे जाऊन लढायची व विजयी व्हायची असे तुपकर यांनी सांगितले तुम्ही सर्वांनी जी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यामुळेच अख्खा महाराष्ट्रात बुलढाणा लोकसभेची निवडणूक ही चर्चेचा विषय ठरला ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि ज्यांनी मला मतदान केले नाही त्यांच्याविषयी सुद्धा माझ्या मनात कुठलाही राग नाही मी जर निवडणुकीत नसतो तर कदाचित मतदानाची टक्केवारी कमी झाली असती आपल्यामुळे या लढाईत रंगत आली. राजकीय सपोर्ट नसताना पैसे नसताना सगळे पुढारी विरोधात असताना सामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली त्यामुळे सगळ्या पुढार्‍यांनी तोंडात बोट घातले असे तुपकर म्हणाले सामान्य घरातील शेतकऱ्यांचा मुलगा हा प्रस्थापितांच्या नाकात दम आणू शकतो हा संदेश बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेला असल्याचे ते म्हणाले आणखी जर 60 ,70 हजार मते मिळाली असती तर थोड्याफार फरकाने आपला विजय नक्कीच झाला असता काही आमदार आपल्याला 25 ते 30 हजाराच्या पुढे धरत नव्हते मात्र निकाल लागल्यानंतर त्यांच्या नाकात दम आला असे तुपकर म्हणाले एका जत्रेने देव म्हातारा होत नाही आपल्याजवळ गमवण्यासारखे काहीच नाही आपले मायबाप वावरात जातात त्यामुळे इकडे कमी झालो तिकडे कमी पडलो याने निराशा न होता जिथे कमी पडलो तिथे कशी दुरुस्ती केल्या जाईल याचा विचार करून पुढे जायचं असे तुपकर यावेळी म्हणाले. ज्या पुढार्‍यांनी आपल्याला प्रचंड विरोध केला होता त्यांच्या गावात सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लीड मिळाली आहे अनेक पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या गावात आपण पुढे आहोत त्यामुळे विधानसभा निवडणूक सुद्धा आपल्याला ताकतीने लढायची आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभेत स्वतंत्र उमेदवार आपण उभे करणार आहोत हा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे जिल्ह्यातील बुलढाणा,चिखली, सिंदखेडराजा,खामगाव, जळगाव जामोद, मेहकर अशा या सहा मतदारसंघात आपले उमेदवार उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागायचे असा आदेश सुद्धा रविकांत तुपकर यांनी दिला यासह त्यांनी अजून एक मोठी घोषणा केली 13 किंवा 14 जुलैला पुणे येथे राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि राज्यात कुठे कुठे विधानसभा लढायचे तेही ठरवणार आहे. याशिवाय राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेत सुद्धा आपले उमेदवार उभे राहणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. राजू शेट्टी यांच्या सोबत या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याची सुद्धा त्यांनी यावेळी सांगितली व मी स्वाभिमानी सोडली नाही असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. आता पुन्हा लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा रविकांत तुपकर यांची आवाज गाजणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page