शाळेच्या अध्यक्षाने केले शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य
खामगाव शहर पोलीस ठाण्यात अध्यक्ष विरोधात तक्रार दाखल

खामगाव:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनावर वाढ होत चालली आहे. असाच एक प्रकार खामगाव शहरात घडला आहे एका शाळेच्या अध्यक्षाने शाळेतील शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला आहे ही घटना 2023 ते 2024 च्या दरम्यान घडली आहे. गोपाल बाबुराव अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित महिला एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती कोरोना असल्यामुळे शाळा बंद होते तेव्हा ऑनलाईन पद्धतीने क्लास घेऊन वेदना शिकवण्यात येत होते 2021 पासून शाळा नियमित सुरू झाली त्यावेळी शाळेचे अध्यक्ष हे अधून मधून शाळेच्या वेगवेगळ्या कामासाठी शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करत असे शाळेत नवीन ऍडमिशन करण्याकरता शिक्षकांना अध्यक्ष यांनी सूचना केल्या त्यानुसार पीडित शिक्षिकेने वीस विद्यार्थी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ऍडमिशन केली त्यामुळे अध्यक्ष यांनी शिक्षकेला केबिनमध्ये बोलून अभिनंदन केले पीडित महिलेला अश्लील हावभाव करून जवळकी साधण्याचा प्रयत्न केला सदर घटनेकडे महिलेने मुलाच्या भविष्यासाठी दुर्लक्ष केले मात्र अध्यक्ष याचा प्रताप काही थांबेना जानेवारी 2024 मध्ये अध्यक्ष यांनी पीडित महिलेला परत अश्लील कृत्य करून महिलेचा विनयभंग केला त्रासाला कंटाळून नोकरी सोडण्याचा राजीनामा पीडित महिलेने दिला मात्र त्यावेळी राजीनामा स्वीकारला नाही. वारंवार अश्लील कृत्य करत सदर महिलेचा विनयभंग करत राहिले. सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दिली सदर घटनेचा पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे