बुलढाण्याच्या तहसील चौकात असे काय झाले की…

बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- दुपारी तहसील चौकात वाहतूक कोंडी का झाली होती ? पाऊस आला होता काय? की एखादा अपघात झाला होता? कोण्या मंत्र्यांनी येथे हजेरी लावली होती का? पण असं काहीच झालं नव्हतं!
झालं असं होतं की,‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’च्या लाभापासून आपण वंचित राहू नये म्हणून तहसील कार्यालय, परिसरातील सेतू कार्यालयामध्ये महिलांच्या व पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान शाळाची घंटा देखील वाजली होती. त्यामुळे तहसील चौकाचा अक्षरशा श्वास गुदमरू लागला होता. दरम्यान 6 पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून ट्राफिक सुरळीत करण्यात आली.’मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ घोषित झाली. आणि बुलढाणा जिल्ह्याभरात महिलांच्या रांगा तहसील, पोस्ट ऑफिस व सेतू कार्यालयावर दिसू लागल्या. योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. गरजूंचा गैरफायदा घेत काही सेतूचालकांनी अव्वाच्या सव्वा फी आकारून मुख्यमंत्र्यांच्या बहिणींची लूट सुरू केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक दाखले प्राप्त करण्यासाठी सेतू केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे.दाखल्यांना वेळ लागेल म्हणून प्रत्येक जण घाई गर्दी करीत आहे. 40 रुपयांना मिळणारे अधिवास प्रमाणपत्र सेतूचालक पाचशे ते सहाशे रुपये सांगत आहेत. तरी देखील महिला लाभ मिळण्यासाठी वाट्टेल ते खर्च करण्यास तयार झाल्या आहेत. आपण पात्र होतो की नाही याचा विचार न करता देखील महिलांचा आटापिटा सुरू असल्याचे चित्र आहे.शासनाने काही कागदपत्राची कमी केली असली तरी काही लोक त्या कागदपत्रासाठी गर्दी करतांना दिसून येत आहे