शिवसाई युनिव्हर्सल स्कूल बुलडाणा मध्ये नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी…
लोकशाही बळकट करण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे शाळा

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- डी एस लहाने मां जि. प सदस्य तथा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बुलडाणा नुकत्याच शैक्षणिक वर्ष 2024-25 ला आरंभ झाला आहे. सर्व विद्यार्थी शाळेमध्ये उत्साहाने येत आहे. शिक्षणासोबत कला ,क्रीडा, विज्ञान, राजकारण आणि समाजकारणा त्याबरोबर मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या अनुषंगाने शालेय जीवनात त्यांना राजकारण आणि समाजकारणाचे धडे देखील दिले जातात. त्या अनुषंगाने शिवसाई युनिव्हर्सल स्कूलमध्ये मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षक वृंदांनी मतदानाचा अधिकार बजावून व विजयी झालेल्या उमेदवारांमधून मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला शिवसाई युनिव्हर्सल स्कुलचे संचालक डी एस लहाने ,व मुख्याध्यापक प्रमोद मोहरकर यांनी मंत्रिमंडळाला दिली शपथ दिली. शिवसाई शाळेला नवीन मुख्यमंत्री म्हणून भुषण कानडजे यांनी शपथ घेतली. गौरव गोरे -शालेय शिक्षण मंत्री, शिवतेज उबरहंडे- शालेय शिस्त मंत्री, प्रणव सोळंकी- विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, जय शेवाळे – पर्यटन क्षेत्रभेट, संस्कृती धंदर – क्रीडामंत्री, काव्या भारंबे – सांस्कृतिक मंत्री अशाप्रकारे मंत्रिमंडळाचा विस्तार संपूर्ण विद्यार्थ्यांच्या उपस्थिती मध्ये ठीक चार वाजता संपन्न झाला सर्व मंत्री महोदयांना आपापल्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
कार्यक्रम प्रसंगी डी एस लहाने यांनी मंत्रिमंडळातील सदस्य व उपस्थितीत विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केलें आपल्या भाषणामध्ये बोलतांना सांगितले की आपण सर्वांनी मिळून लोकशाही बळकट करावी आणि यांचे बाळकडू शिक्षकांनी विद्यार्थ्यानं शालेय जीवनात द्यावें तसेच हेच विद्यार्थि भविष्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे व देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत असे प्रतिपादन केलें या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन भागवत उबरहंडे यांच्या मार्गदर्शनात शिवसाई युनिव्हर्सल स्कूल च्या शिक्षक व शिक्षिका कर्मचारी यांनी केले यांनी उत्कृष्ट रित्या आयोजन केले होते.