आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते बस स्थानक परिसरातील काँक्रिटीकरण रस्त्याचे ०२ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा

बुलढाणा :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा बसस्थानक परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला.
बुलढाणा बस स्थानक परिसराची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती, आणि त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत होते,एस टी महामंडळाच्या उत्पन्नात झालेली घट आणि महामंडळ अडचणीत आल्यामुळे आतापर्यंत ही कामे होऊ शकली नव्हती परंतु आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बुलढाणा बस स्थानकासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला, ०२ कोटी ५० लक्ष रुपयाचे निधीमधून बस स्थानक परिसरातील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज दिनांक १५ जुलै २०२४ रोजी लोकार्पण सोहळा पार पडला.
येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांकरता देखील अद्यावत अशी इमारत उभी राहणार असून यामध्ये चालक आणि वाहक यांच्या आराम करण्याकरता सुसज्ज व्यवस्था, महिलांकरिता स्वतंत्र व्यवस्था, विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्टर तसेच मनोरंजनाची साधने तसेच भविष्यामध्ये चांगल्या स्वरूपाचे काम बस स्थानकाचे झाल्यानंतर प्रवाशांची तसेच कर्मचाऱ्यांची देखील गैरसोय होणार नाही असे यावेळी आमदार गायकवाड यांनी सांगितले.यावेळी त्या ठिकाणी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच बुलढाणा आगाराचे सर्व अधिकारी कर्मचारी वाहक,चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.