आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा भव्य भगवा झंजावात
मतदारसंघातील गावागावांमध्ये घराघरांमध्ये शिवसेनेचा भगवा तसेच वंदनीय बाळासाहेबांचे विचार पोहोचविणार - आमदार संजय गायकवाड

बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना, युवासेना, किसानसेना, महिलाआघाडी अल्पसंख्यांक सेनाच्या शाखांचे मोठ्या जल्लोषामध्ये उद्घाटन सुरू आहे
दि- १४ जुलै २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलडाणा तालुक्यातील १० गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा भव्य भगवा झंजावात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वांमध्ये संपन्न झाला,यावेळी त्या ठिकाणी सोबत महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेना,किसानसेना,महिला आघाडी, अल्पसंख्याक सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शिवसैनिक प्रत्येक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.