अमरावती – मुंबई गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस ,दादर नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस ,सह भुसावल -नागपुर दरम्या धावणाऱ्या ३० गाड्यांमध्ये जनरल ( सामान्य) कोच वाढणार…!

मलकापुर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-(करण झनके)- अमरावती – मुंबई गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस ,दादर नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस ,सह भुसावल -नागपुर दरम्या धावणाऱ्या ३० गाड्यांमध्ये जनरल ( सामान्य) कोच वाढणार .
याबाबत अधिक असे की गेल्या एक दीड वर्षापासून रेल्वे प्रशासनाने प्रत्येक गाडीचे जनरल व स्लीपर कोच कमी करून एसी डबे वाढविले होते परिणामी सर्वसामान्य जनतेला याबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत होते.
या प्रश्नावर जिल्हे प्रवासी( सेवा) संघाचे अध्यक्ष व भुसावळ रेल्वे सल्लागार समिती सदस्य ॲड महेंद्र कुमार बुरड यांनी रेल्वे मंत्र्यांना पर्यंत आवाज उठवीला होता मागील महिन्यात २६ जून झालेल्या डी .आर .यु .सी. सी. मीटिंग मध्ये डी .आर .एम .इती पांडे यांनी याबाबत रेल्वे प्रशासनात ठोस कारवाही करीत असून जनरल डबे लवकरात लवकर संकेत दिले होते याची अंमलबजावणी होत अमरावती – मुंबई गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस ,दादर नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस ,सह भुसावल -नागपुर दरम्या धावणाऱ्या ३० गाड्यांमध्ये जनरल ( सामान्य) कोच वाढणार.
भुसावल नागपूर मार्गावरील जवळपास 40 गाड्यांपैकी १० गाड्यात अजून जनरल डबे वाढविण्याचे प्रयत्न प्रवासी संघ करीत असून यात प्रमुखाने शालीमार एक्सप्रेस, आजाद हिंद एक्सप्रेस ,नागपूर- पुणे एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस ,अहमदाबाद- पुणे एक्सप्रेस, बिकानेर सिकंदराबाद हिसार एक्सप्रेस ,आदींचा समावेश आहे