केवट समाजाच्या मागण्या त्वरित निकाली काढाव्यात केंद्रीय राज्यमंत्री मा. खासदार प्रतापराव जाधव यांना निवेदन
कोटवार बुक मध्ये जातीचा उल्लेख तागवाले असा न करता केवट करावा ही प्रमुख मागणी

सिंदखेड राजा :- आपला बुलढाणा जिल्हा बातमी:- प्रतीक सोनपसारे:- केवट समाज महासंघाच्या वतीने केवट, तागवाली,तागवाले या जाती समुहाचे प्रकरण तात्काळ निकाली काढून केवट समाजाला न्याय द्यावा , निवेदनात असे स्पष्ट केले आहे केवट समाज भटक्या जमाती ‘ ब ‘ (२५/१२) या संवर्गात येत असून आमच्या पूर्वजांचा व्यवसाय नदीकाठी भटकंती करत ताग काढण्याचा आणि मासेमारी करण्याचा होता त्यामुळे आमच्या जातीचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी तागवाले / तागवाली अशा प्रकारचा केला गेला आहे परंतु आमचे समाजबांधव आजच्या युगात आपल्या मूलभूत अधिकारांचा उपयोग करत स्थिर होऊ पाहत आहे पण कोटवार बुक मध्ये केवट नसून तागवाली शब्द ‘जात’ म्हणून लिहिला त्यामूळे आमच्या केवट समाजाच्या विद्यार्थ्यांना जात व जात वैधता प्रमाणपत्र काढताना अडचणी निर्माण होत आहे तसेच विद्यार्थ्यांना भटक्या जमाती ‘ब’ या संवर्गाचे प्रतिनिधित्व करता येत नाही त्यामुळे त्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश करण्यात येतो त्यामुळे केवट समाजाच्या विद्यार्थ्यांना विवीध सोयी सुविधा तथा विविध खात्यांमधील नोकरींपासून वंचीत राहावे लागते असे निवेदनात म्हटले आहे यावेळी केवट समाज महासंघाचे वतिने सचिव रमेश केवट यांनी दिनांक 23 जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री मा.खासदार प्रतापराव जाधव साहेब यांना दिले आसता निवेदनात म्हटले आहे की , केवट समाजला न्याय मिळावा त्यासाठी अमरावती येथील जन-सूनवाईत कागदोपत्री पुराव्यानिशी बाजू मांडण्यात आली ,तसेच 24 सप्टेंबर 2022 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व अंढेरा येथे आयोगामार्फत क्षेत्र पाहणी ह करण्यात आली या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आयोगाने 23 जानेवारी 2024 रोजी सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे सादर केला आहे मात्र आजपर्यंत आमच्या केवट समाजाला तागवाला तागवाली,तागवाले, जातीची प्रकरण निकाली काढण्यात आले नसून आमच्या समाजातील मुलांचे शैक्षणिक व आर्थिक सामाजिक नुकसान होत आहे विद्यार्थी न्यायापासून वंचित राहत आहे तरी या सर्व गोष्टींचा योग्य तो विचार करून केवट तागवाला, तागवाली, तागवाले या जातीसमूहाला त्वरित न्याय देण्यात यावा आशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली यावेळी केवट समाज महासंघाच्या वतीने रमेश केवट ( सचिव ),दिनकर दधरे ,ज्ञानेश्वर देव्हरे, गजानन बिथ्रे, रामेश्वर परसणे व समाजातील बांधव उपस्थित होते.