बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये शिवसेना शाखा उद्घाटनाचे गावकऱ्यांनी केले मोठ्या जल्लोषांमध्ये स्वागत

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची लोकप्रिय शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा विधानसभा गावागावांमध्ये शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाची मोठ्या जल्लोषात, असंख्य माता-भगिनींच्या साक्षीने धडाकेबाज सुरुवात करण्यात आली आहे.
दिनांक १५ जुलै २०२४ रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील उमाळा, दत्तपूर, पळसखेड नाईक,पळसखेड नागो, दहिद बु, पाडळी,गिरडा, गोंधनखेड, ईजलापूर,मढ,गुम्मी, तराडखेड, जनुना या गावामध्ये शिवसेना, युवासेना, किसानसेना, महिला आघाडीच्या शाखा उदघाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले, यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक गावातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.