बुलढाणा शहरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

बुलढाणा( आपला बुलढाणा जिल्हा बातमी) आषाढी एकादशीनिमित्त जुना गाव येथील प्रतिपंढरपूर असणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रुद्राभिषेक तसेच प्रसादाचे वाटप सुद्धा करण्यात आले.
जुना गाव येथील विठ्ठल रुक्माई चे मंदिर सर्वात प्राचीन मंदिर आहे. सकाळपासूनच या मंदिरात दर्शणार्थ परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. यावेळी मंदिर परिसर भक्तीमय वातावरण होते.श्री विठ्ठल मंदिरातील गाभारा आकर्षक फुलांची आरास करून सजविण्यात आला.सकाळपासून विठ्ठलाची सजावट करण्यात भाविक दंग दिसून आले. तुळशी माळा,कपाळी बुका आणि चंदन असा सौंदर्याचा थाट दिसून आला. मंदिर परिसरात वृद्धांनी भक्तीगीत, भजने गाऊन आपला आनंद विठ्ठल चरणी अर्पण केला.जुना गाव येथील सदर मंदिर अति पुरातन असून येथे भक्तांची मनोकामना पूर्ण होते, अशी माहिती पुजारी रवींद्र चिंचोळकर यांनी दिली आहे.