वरुण राजाच्या उपस्थितीत शिवसाईची वारी विठुरायाच्या दारी
शिवसाई मध्ये अवतरली पंढरीची वारी.

बुलढाणा :-आपला बुलढाणा जिल्हा बातमी:- विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, रामकृष्ण हरी, विठुरायाच्या नामघोषात अवघा महाराष्ट्राच नव्हे तर अवघा आसमंत दणाणून निघतो. शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कुल चे विद्यार्थी आज सकाळीच विठ्ठल-रुक्माई व वारक-याच्या वेशभूषेत तयार होऊन शाळेमध्ये आले उपस्थित होते. शिवसाई ज्ञानपीठ चा परिसर टाळ व मृदुंगाच्या निनादाने मंत्रमुग्ध झाला होता दरवर्षी प्रमाणे शिवसाई चे विद्यार्थी वारकरी व विठ्ठल-रुखमाईच्या, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज ईत्यादी संतांच्या वेशभूषेत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या वर्षी प्रथमच पालकांच्या सहकार्याने वर्ग नर्सरी, ज्युनिअर व सीनिअर केजी चे चिमुकले विविध वेशभूषेत पादचाऱ्यांना आकर्षित करत होते. तसेच वर्ग १ ली ते १० वी चे विद्यार्थी दिंडी वारी मध्ये विविध देखावे सादर करीत विठुरायाचा नामाचा जयघोष करीत रस्त्याने पावली, फुगडी खेळत उपस्थितांची वाहवा मिळवत होते. विठ्ठलाच्या वेशभूषेत ईश्वरी डुकरे, दिव्यांका भुसारी, मंजिरी दांडगे, अद्वैत उबरहांडे,उन्नती गोडंबे. नैतिक चव्हाण. पालखीची धुरा संग्राम चव्हाण, रुद्र देवकर, आयुष कड देवांश मांट्टे ,रितेश कणखर ,महेश जाधव यांनी सांभाळली. पालखी मधे विठ्ठल रुखमाई मोठया दिमाखात शोभून दिसत होती.
सकाळीच वरुण राजाचे आगमन झाले होते. परंतू विद्यार्थ्यांचा उत्साह व पालकांचे सहकार्य व शिक्षकांची खंबिर साथ असल्यामुळे पायी दिंडीचे यशस्वी आयोजन झाले. दिंडी सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा महिला व पुरुषांची संख्या वाखण्याजोगी होती महिलांनी पालखीचे स्वागत केले व शुभेच्छा देत विठूरायाच्या नावाचा जयघोष केला. शिवसाईच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थिताना प्रसादाचे वाटप करण्यात आले, पायी दिंडी वारी तुळशी नगर परिसर परिसर ते एच.डी.एफ.सी. चौक, ते चिंचोले चौक नंतर राम नगर व शिवसाई ज्ञानपीठ मधे समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी डी एस लहाने संस्थेचे अध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बुलडाणा एकादशीचे महत्व सांगत आपण सर्वांनी भक्त पुंडलिका प्रमाणे आपल्या आई वडिलांची सेवा करा असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत संस्कार ज्ञान देखील महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुष्पा गायकवाड, पुजा गवले यांच्या मार्गदर्शनात शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूल चे महिला शिक्षिका व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली व नंतर विद्यार्थ्यांना लाडु व प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.