वरवंड शिवारात अनोळखी महिलेचे आढळले प्रेत
जानेफळ पोलीस स्टेशनने प्रेताबद्दल माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे केले अहवाल...

जानेफळ (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):– बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका अंतर्गत जानेफळ परिसरात अनोळखी स्त्री जातीचा मृत्यू झालेला आहे अंदाजे वय ४५ वर्ष आहे.दिनांक १७/०७/२०२४ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ग्राम वरवंड तालुका मेहकर शिवारातील आश्रम शाळेसमोर मिळून आले आहे. सदर महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही याची मृत्यूचे बाबत पोलीस स्टेशन जानेफळ येथे आ.मॄ.नंबर २०/२०२४ कलम १९४ BNNS २०२३ प्रमाणे दि.१७/०७/२०२४ रोजी दाखल असून अनोळखी स्त्री जातीचे वय अंदाजे ४५ वर्षे अंगात निळ्या रंगाची टीपटॉप चे ब्लाउज व निळ्या रंगाची साडी केस लहान व चेहऱ्यावर खरचटलयचे निशान व उजव्या हातावर मंदिरा सारखा गोंदण्याचे चित्र आहे.
तरी या महिलेबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास जानेफळ पोलीस स्टेशनला कळवावे.खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. पोहेकॉ अजिनाथ मोरे ८१४९४०७२४५ /पोहेकॉ कैलास चतरकर ९५२७५३१८९९/ पोहेकॉ गणेश शिंदे ९६३७५६०८१९ या नंबर वर कळवण्याचे जानेफळ पोलीस स्टेशन नी आव्हान केले आहे.