कामगारांच्या हितासाठी कीतीही केसेस दाखल झाल्या तरी मागे हटणार नाही.जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे
कामगार कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा.कामगार कल्याण च्या अधिकाऱ्यांना 30 जुलै पर्यंत अल्टीमेंटम.

बुलढाणा: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे लायसन्स रिन्यूअल होत नाही त्यांना जे साहित्य मिळतं त्या साहित्याचे वाटप सत्ताधारी लोकप्रतिनिधिंच्या कार्यालयातून होत आहे. हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःच फोटो लावून त्यांच्या कार्यालयात त्याची वाटप करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कामगार कार्यालय त्यांचे प्रश्न सोडवण्याचा काम करत आहे भ्रष्टाचाराची दलदल झालेली आहे या कामगार कार्यालयामध्ये कामगारांवर प्रचंड अन्याय होत आहे. 30 तारखेपर्यंत कामगारांचे जे प्रश्न आहे ते सोडवले गेले नाहीत तर प्रचंड असा मोर्चा घेऊन काँग्रेस पक्ष येणार आणि या कामगार कार्यालय अधिकाऱ्यांना, त्यांच्या कार्यालयात त्यांना कुलूप लावून बंद करू प्रसंगी कामगारांसाठी कीतीही केसेस आमच्या वर दाखल झाल्या तरी मागे हटणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुल भाऊ बोंद्रे यांनी दिला.सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी अभिवादन करून तसेच कामगारांना पोवाडा सादर करून धडक आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलन जयस्तंभ चौक, संगम चौक मार्गे जिल्हा कामगार कार्यालयावर धडकले यावेळी विविध घोषणान्नी परिसर दुमदूमला होता तसेच हातात धरलेले विविध मागण्यासाठी चे फलक, झेंडे लक्ष वेधत होते.
जिल्हयातील बांधकाम कामगारांना विविध समस्यांना तोंड दयावे लागत असुन जिल्हयातील कामगारांना गृह उपयोगी संच व इतर आवष्यक साहित्यांचे वाटप करण्यात येत असतांना काही मतदार संघात साहित्य वाटप रखडल्याने वंचित राहण्याची पाळी येवून ठेपली आहे. एखादा अपघात घडल्यास नोंदणी अभावी कामगार मुत्यूमुखी पडल्यास ग्रामसेवक, मुख्याधिकारी की कामगार अधिकारी यापैकी कोणास जबाबदार धरणार? नविन बांधकाम कामगारांची तात्काळ नोंदणी करण्यात यावी, बांधकाम कामगारांच्या दैनंदीन जिवनात त्यांना भेडसावणा-या विविध समस्या संदर्भात व मागण्यांसाठी तसेच जिल्हयातील बहुतांषी बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी कामगार कल्याणकारी मंडळात केली असुन त्यांना मंडळामार्फत शासनाच्या विविध योजना लागु करण्यात येतात. मात्र अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन व भविष्यासाठी त्यांच्याकडे रोजमजुरी शिवाय पर्याय नाही, तसेच कामगारांच्या कुटूंबातील अनेक हुशार मुला-मुलींकडे अधुनिक साहित्य देखील नाही. बांधकाम कामगारांच्या समस्या दिवसागणीक वाढतच आहेत. या कामगारांसाठी विमा संरक्षण देण्यात आले होते, मात्र सन 2015 पासुन नंतर यासाठी आवश्यक ती पुर्तता न झाल्याने नव्याने नोंदणी झालेले कामगार विमा संरक्षणापासुन वंचित आहेत. कामगार कल्याण मंडळाकडुन कामगारांसाठी गृह उपयोगी संच उपलब्ध करून देण्यात आलेले असतांना केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी काही विधानसभा मतदार संघातील कामगारांचे साहित्य संच वाटप रखडले आहे.
ग्रामसेवकांच्या प्रमाणपत्रा अभावी ग्रामीण भागात नोंदणी रखडली आहे ती तात्काळ करण्याची व्यवस्था करावी, ग्रामपातळीवर कामगारांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्ययात यावे, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कामगारांची ससेहोलपट थांबवावी, या व इतर अनेक समस्यांनी बांधकाम कामगार बांधवांना ग्रासले आहे. या समस्यांच्या विळख्यातुन कामगार बांधवांच्या सुटकेसाठी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने आज धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा कामगार अधिकारी यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने कामगारांच्या विविध मागन्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.चिखली तालुक्यात सक्रिय म्हणून 19 हजार कामगारांची नोंदणी झाली असून जिल्हाभरात किट वाटप सूरू असताना जाणिवपुर्वक चिखली तालुक्याला वंचित ठेवण्यात आले आहे. 6 महीन्यांपासून 15 हजार किट तयार गोडावून ला पडून असून जाणिवपुर्वक त्यांचे वाटप थांबविण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुल भाऊ बोंद्रे यांनी पदाधिकाऱ्यांसह, जिल्हा कामगार अधिकारी राठोड यांना त्यांच्या कार्यालयात प्रचंड आक्रमक होत घेराव घातला असता, तातडीने कामगारांना किट वाटप करण्यासंदर्भात प्रश्न विचारले असता, उद्यापासून लिस्ट लावल्या जातील आणि 200/300 कामगारांना किट वाटप करणार असल्याचे राठोड त्यांनी सांगितले तसेच आणि जर ते वाटप झाले नाहीतर काॅग्रेस गोडावून ताब्यात घेउन आपण वाटप करणार असल्याचे काँग्रेस ने जाहिर केले..
यावेळी मा. आ. हर्षवर्धन सपकाळ, आमदार धिरज लिंगाडे, मा. आ. दिलीपकुमार सांनंदा यांनी जिल्हा कामगार अधिकारी राठोड यांना विविध प्रश्नांसाठी धारेवर धरले. यावेळी हाजी रशीद खान जमादार, डॉ अरविंद कोलते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सचिव जयश्रीताई शेळके, कुणाल बोन्द्रे, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष मो. एजाज मो. मंजूर, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, विजय पाटील शेजुळ, ऍड. जावेद कुरेशी, सतीश मेहेंद्रे, सभापती डॉक्टर संतोष वानखेडे, साहेबराव पाटोळे, डॉ. इसरार, सुनील सपकाळ, निलेश पाऊलझगडे, शेख समद, एकनाथ चव्हाण, गजानन खरात, सरस्वती ताई खाचणे, विजय काटोले, अमर कुळे, नंदिनीताई टारपे, समाधान सुपेकर, सुनील तायडे, नंदू शिंदे, राजू पाटील, कामगार नेते सतीश शिंदे, गजानन लांडे पाटील, अथउद्दीन काझी, राहुल सवडतकर, दत्ताभाऊ काकस, मोहन शेठ जाधव, किशोर सोळंकी, जाकीर कुरेशी, रामभाऊ जाधव, मोहम्मद वसीमदिन, कल्पना पाटील, डॉ. सत्येंद्र भुसारी, दीपक थोरात, खलील बागवान, गणेश पाटील, डॉ. पुरुषोत्तम देवकर, अॅड. विजय सिंग राजपूत, शिवराज पाटील, शेजजाद भाई, किशोर साखरे अनिल फेपाळे, राहुल उगले, आरिफ बागवान, निसार भाई, सय्यद जाकीर, अनिल वारे, वसंता सोनुने, राजेंद्र सोनुने, गोकुळ शिंगणे, राजू रजाक, राजू भटकर, राजू नेता , गजानन खिल्लारे, छोटू गवळी, शरीफ भाई , बाजीराव उन्हाळे, रंजीत झाल्टे, सुभाष सोनवणे, मदन शेलार, भगवान हिवाळे, राजू जाधव, भगवान राजमाने, सनी पांढरे, राहुल सुरडकर, प्रकाश राठोड, रमेश भिसे, फिरोज खान, समाधान गीते, शेख शरीफ शेख सुभेदार, जाकीर अतार, रोहन करंडे, दिलीप राजपूत, पाटीलबा वाघ , वेंकटेश रिंडे, प्रकाश तायडे, मनोज जाधव, अनंता जाधव, जितु राणा, लक्ष्मण भिसे, प्रवीण गाडेकर, सुरेश सरकटे, मारुती सोनवणे, सुरेश सोनवणे, सदाशिव सोनवणे, शालिग्राम सोनवणे, प्रवीण उभरहंडे , कैलास भोरकडे, कमलाकर उबाळे, राजेश जाधव, उत्तम भोसले आदी उपस्थित होते.