मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापना…
देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-देशातील कुठल्याही दवाखान्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी , उपचार घेता यावा दृष्टिकोनातून बुलडाणा जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
बुलढाणा येथील जिल्हा केंद्रीय बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली ते म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी माझ्या कार्यावर विश्वास ठेवुन चौथ्यांदा निवडून दिले आणि त्यांच्याच आशीर्वादाने केंद्रामध्ये आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार असलेल मंत्रीपद आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्रीपद मला मिळाल .या मंत्रिपदाचा फायदा बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना ,रुग्णांना झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम स्थित असलेल्या आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे देशभरातील आणि राज्यातील कोणत्याही दवाखान्यामध्ये दिल्ली मुंबई हैदाबाद आणि एम्स हॉस्पीटल असेल तेथेही बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना व रुग्णांना उपचार घेता यावा त्यांच्या मदतीसाठी हा कक्ष उभारला आहे कोणत्याही आजारातील उपचार आणि शस्त्रक्रिया संदर्भातील माहिती या कक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना सहज मिळणार आहे .या आरोग्य कक्षाचे प्रमुख म्हणून राजू भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा मोबाईल नंबर 8830330754 हा असून त्यांच्याशी रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.