Homeबुलढाणा (घाटावर)
विनय कुलकर्णी सर्पमित्र यांनी पवन डवळे यांच्या घरासमोर निघालेल्या विषारी घोणस सापाचे पिल्लू ला शिताफिने कैद

लोणार :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी (लखन जाधव):- लोणार तालुक्यातील शारा येथे पवन डवळे यांच्या घरासमोर सकाळीच ८:३० वाजता. विषारी घोणस जातीचा सापाचे पिल्लू आढळून आला. दरम्यान सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना फोन करून बोलवण्यात आले. सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी या घोणस जातीच्या सापाला पकडून वन विभाग कडे दिले आहे. विनय कुलकर्णी म्हणाले कि पावसाळ्यामध्ये सगळ्या सापांचा जन्म होतो त्यामुळे ग्रामीण भागात काळजी घेणे गरजेचे आहे, आपल्या घरी किंवा घराच्या आसपास कोठेही साप आढळून आल्यास घाबरून न जाता कृपया एक कॉल करा आणि सापाला जीवदान द्या. दरम्यान सर्पमित्र जीवाची परवाना न करता विषारी सापांना पकडतात याबद्दल पवन डवळे व शेजारच्या लोकांनी त्यांचे आभार मानले.