लोणार आठवडी बाजार शेड झाले गाडयाचे पार्किंग
शेड मधे उभे राहतात फक्त गाड्या; बाजार भरतोय रस्त्यावर

लोणार:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- यासीन शेख- लोणार शहर जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ ओळखल्या जाते परंतु शहरात कोणत्या प्रकारची सोई सुविधा उपलब्ध नाही शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे शहरवासी फेसबुकच्या माध्यमातून शहरातील समस्या मांडत आहे.आठवडी बाजारसाठी शासनाने लाखों रूपय खर्च करुन मोठा शेड तयार केला. व्यापाऱ्यासाठी बाजार वटे तयार केले परतु नगर परिषद प्रशासनाचा दुर्लक्षामुळे व घाणीचे साम्राज्यामुळे व्यापारी टिन शेडचा बाहेर तर काही व्यापारी रस्त्यावर आपले पाल मांडत आहेत. या शेडचा फायदा होतोय गाड्या व मोकाट जनावरे यांना परतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही लांखो रुपय खर्च करून बनविलेले टिन शेड व बाजार वठे गाडयाचे पार्किंग झाले आहे शासनाचे लाखोरूपये पाण्यात गेले आहे का? याकडे न.प. लोणार लक्ष देणार का?