शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुकुल ज्ञानपीठ स्कूल येथे शालेय साहित्याचे वाटप

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- आज दि.२७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने शिवसेना नेते डॉ.मधुसूदन सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाणा येथील गुरुकुल ज्ञानपीठ स्कुल,बुलढाणा येथे वही, पुस्तक,ड्रेस आणि बिस्कीट पुडे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध प्रकारे तसेच सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे यामध्ये बुलढाणा येथील शिवसेना नेते डॉ.मधुसूदन सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाल गोपालांना म्हणजेच चिमुकल्या विद्यार्थ्यांना ज्या मूलभूत गरजा त्यांना लागतात त्यांचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये मुलांना शालेय दृष्टिकोनातून वही पुस्तक तसेच ड्रेस आणि खाऊ म्हणून बिस्कीट चे पुड्यांची वाटप करण्यात आली आहे.यावेळी गुरुकुल ज्ञानपीठ स्कुल चे प्राचार्य श्री.मराठे सर, शिक्षकवृंद-शिक्षिका,कर्मचारी वर्ग,आणि सर्व गुरुकुल परिवार उपस्थित होता.