मराठी माणसाचे लढवय्येपण उद्धव ठाकरे साहेबांनी जपले – जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-महाराष्ट्राने देशाला स्वाभिमानाचा विचार दिला आहे. कितीही मोठे संकट आले तरी कायम मराठी माणसाचं लढवय्ये पण दिसून येते. राजकीय दृष्ट्या देखील गतकाळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या लढवय्ये पणाला एक प्रकारे आवाहन देत ते जपले आहे. लोकसभेत त्याचे परिणाम दिसून आले तसेच आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना कुटुंबप्रमुख म्हणून मायबाप जनता साथ देईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर, रुग्णांना फळ वाटप, गरजूंना अन्नदान यासह विविध कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी जालिंदर बुधवत म्हणाले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे बाळकडू आम्हाला हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुखांकडून मिळालेले आहे.
दिल्लीच्या सुलतानी प्रवृत्तीला महाराष्ट्र गाडतोच हा आजवरचा इतिहास आहे. स्वाभिमान आणि सन्मानाने उभी राहिलेली मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई शिवसेना कायम लढत आलेली आहे. वंदनीय बाळासाहेबांनी उभे केलेले हे धगधगते संघटन पुढे नेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समाज हिताचा वारसा कायम ठेवला आहे. कुठल्याही संकटाला न घाबरता महाराष्ट्र धर्माला जागत गद्दारीला धडा शिकवत शिवसेना पुन्हा नव्या उभारीने, नव्या जोमाने काम करत आहे. संकटकाळी धावून जाण्याची शिवसेनेची वृत्ती हीच शिवसेनेला अधिक बळकटी देते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा हा वाढदिवस समाजहिताच्या उपक्रमातून आम्ही साजरा केला असल्याचे जालिंदर बुधवत म्हणाले. निवडणुका येतील जातील . सत्ता येईल जाईल पण समाजाच्या हितासाठी शिवसेना कायम उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करत राहील असेही ते म्हणाले. जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार संदीप शेळके यांनी गर्दे वाचनालय बुलडाणा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे रुग्णांना फळ वाटप, अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व स्नेहभोजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी गर्दे वाचनालयात जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या हस्ते श्री संदीप शेळके यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्धघाटन संपन्न झाले.
यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, किसान सेनेचे अशोक गव्हाणे, युवानेते अमोल बुधवत, युवासेना उपजिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, युवासेना शहर प्रमुख सचिन परांडे, उप तालुका प्रमुख संजय गवळी, ओमप्रकाश नाटेकर, विजय इतावारे, मा पं स सभापती सुधाकर अघाव, एकनाथ कोरडे साहेब, आशिष बाबा खरात, मोहम्मद सोफियान, सरपंच रामेश्वर बुधवत, उपसरपंच राजु मुळे, रवि गोरे, राहुल जाधव, अनिकेत गवळी, रामू राजपुत, सरपंच भगवान नरोटे, अनिल जाधव, संभाजी शिंदे, संतोष आवटे, वीरेंद्र बोरडे, रवींद्र मिसाळ, सुधाकर मुंढे, गोविंद दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.