केंद्रीय आयुष , आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नागझरी येथे जाऊन केले मृतक कृष्णाच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर थेट नागझरी येथे जाऊन मृतक कृष्णा कऱ्हाळे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन सरकार आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दिला.
शेगाव तालुक्यातील नागझरी येथील १४ वर्षीय विद्यार्थी कृष्णा राजेश्वर कराळे हा 23 जुलैला शेगाव येथे शाळेत आला होता शाळा सुटल्यावर कृष्णा घरी परतला नाही. कृष्णाच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही शेवटी कृष्णाचा मृतदेह हा भास्तन शिवारात आढळून आला दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे शाळकरी विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे या संदर्भाची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांना मिळाली 27 जुलैला जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर त्यांनी थेट नागझरी येथे जाऊन मृतक कृष्णाच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं सरकार तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास कराळे कुटुंबीयांना दिला या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा झाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून ठाणेदर पाटील यांना निर्देशीत केले यावेळी त्यांच्यासोबत मेहकर चे आमदार संजय रायमुलकर शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम गाणे तालुकाप्रमुख रामा थारक उमेश पाटील उमेश शेळके उपस्थित होते