उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त गोंड, वैदूंच्या पालावर डॉ. बछिरे कडून ब्लॅंकेट वाटप

लोणार – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मानवतावादी उपक्रमाने सप्ताह साजरा होत असताना आज गोंडवैदू यांच्या पालावर ब्लॅंकेटचे वाटप शिवसेना उ.बा.ठा. चे जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपाल बछिरे व त्यांचे सहकारी शहर प्रमुख गजानन जाधव सर, लुकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, तानाजी अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आले
मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत मानवतावादी भावनेने विविध उपक्रम घेतले जात आहे त्यापैकीच एक उपक्रम, समाजापासून दुरावलेले वंचित, दुर्लक्षित घटक म्हणजे वैदू व गोंड समाज या समाजातील महिला भगिनींना ब्लॅंकेटचे वाटप करून एक मानवतावादी आदर्श दृष्टिकोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने समाजासमोर ठेवण्यात आला याप्रसंगी लोणारचे शहर प्रमुख गजानन जाधव सर शहर उपप्रमुख लूकमानभाई कुरेशी युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, विभागप्रमुख तानाजी अंभोरे गणेश पाठे प्रसेंजित बछिरे प्रामुख्याने उपस्थित होते व मोठ्या संख्येने वैदू, गोंड बंधू-भगिनिन्ना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.