बनावट इंस्टाग्रामवर टाकला पत्नीचा अश्लील फोटो!

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) :- पत्नीपासून वेगळा राहणाऱ्या पतीने बनावट इंन्सटग्राम आयडी तयार करुन त्यावर पत्नीचा फोटो लावुन फोटोवरती अश्लिल मजकूर टाकल्याची घटना बुलढाण्यात समोर आली आहे. न्यायालयात फारकत प्रकरण सुरू असल्याने पती हाच आरोपी असल्याचा संशय पिडीतेने व्यक्त केला.
बुलढाणा येथे राहणारी विवाहिता बुलडाणा येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. तीचे लग्न मंठा येथील अजय मनोहर खंदारे याचे सोबत 2018 मध्ये झालेले होते. परंतु मागील 3 वर्षापासुन विवाहिता माहेरी आई वडीलांकडे राहते. 24 जुलै रोजी सकाळी अंदाजे 8.00 वा.चे दरम्यान विवाहितेच्या मामी घरी आल्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझे बनावट इंन्सटग्राम आयडी तयार करुन त्यावर फोटो लावुन त्या फोटो वरती अश्लिल शब्द रचना तयार करून समजात बदनामी करत आहे.असे सांगितले.
दरम्यान मा.न्यायालयात फारकत प्रकरण सुरू असल्याने सदर इंन्सटाग्राम आयडी अजय खंदारे याने बनविली असल्याचा संशय पिडीतेने व्यक्त केला आहे. या प्रकरणी 25 जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात येऊन आरोपीवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.