शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून एकाला लाथा बुक्क्यांने मारहाण

खामगांव ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून एकाला लाथा बुक्क्यांने मारहाण करून शिवीगाळ केली व जिवाने मरणाच्या उद्देशाने डोक्यात कोयता घालून गंभीर जखमी केल्याची घटना खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपराळा शिवारात घडली.
खामगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत 25 जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिषेक विजय पेसोडे, रा. पिंप्राळा ता. खामगांव यांनी ही तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत म्हटले की 22 जुलै रोजी माझे वडील विजय श्रीराम पेसोडे हे मौजे पिप्राळा शिवारातील किर्ती गोल्ड सोया प्लान्ट यांच्या शेतातील गट क्र. 311 पुर्वेकडील नकाशा मधील रस्त्याने डांबर रोडकडे घरचे जनावरे चारण्यासाठी घेवुन जात होते. दरम्यान दुपारी 12 वाजताच्या सुमारास गावातील आकाश हिरामन माने हा सदर शेतामध्ये जनावरे चारत असतांना माझ्या वडीलांना म्हणाला की हे पडीत जमीन मी चारण्यासाठी घेतली आहे. तुम्ही या रस्त्याने जनावरे नेवु नका या कारणा वरून तोमाझ्या वडीलांच्या अंगावर धावला. हातातील कोयता घेवुन जिवाने मारण्याच्या उददेशाने वडीलांच्या डोक्यात मारून वडिलांना गंभिर जखमी केले. लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यांचे भांडण चालु असतांना भानुदास पेसोडे त्यांच्या शेतामध्ये काम करीत असलेले श्रीकृष्ण नारायण पेसोडे यांनी भांडणाचा आवाज आल्याने ते सदर ठिकाणी जावुन पाहिले असता आकाश माने हा त्यांना पाहुन घटनास्थळावरून पळुन गेला. जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.