बरं का हिरवी मिरची झाली फिक्की!
१० हजाराला विकल्या जाणाऱ्या मिरचीचे दर ५ हजारावर!-मिरची तोडणीची मजुरी व खर्च निघेना!

चांडोळ :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरातील एप्रिल व मे महिन्यात उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या मिरची पिके परिसरात मोठ्या प्रमाणात तोडणीसाठी आल्याने मिरची तोडून पिंपळगाव रेणुकाई येथे मार्केटमध्ये विक्रीसाठी न्यावी लागत आहे. परंतु अचानक मार्केटमध्ये मिरचीची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना १०ते ११ हजार रुपये विकणारी मिरची आता ४ ते ५ हजार रुपये किंव्वटल या दराने विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी परिसरातून मिरची विक्रीसाठी पिंपळगाव येथील बाजारात मिरचीला मोठ्या प्रमाणात चांगला भाव मिळत होता. मिरचीचे दर १० ते १२ हजार किंव्वटल रुपयांपर्यंत गेला होता. परंतु आता हिरव्या मिरचीचे दर कोसळुन ४ते ५हजार रूपयावर येऊन ठेपला आहे.हिरवी मिरचीचे दर कोसळणेल्याने शेतकऱ्यांना मिरचीवरील औषधी फवारणी व तोडणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यातच मिरची पिकावर पडलेल्या कोकडा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने धाड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिके उपटून बंधाऱ्यावर फेकून दिली आहे. त्यातच शेतकऱ्यांनी उन्हाळी हिरवी मिरचीवर महागडी औषधे मारून शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विकतचे टँकरचे पाणी टाकून कसेबसे मिरचीचे पीक जगवले मात्र आता तोडणीच्या वेळेवर शेतकऱ्याच्या मालाला बेभाव विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना सिमला, पिकाटोर, ज्वेलरी, ,शार्क तलवार, लालपरी, आदी मिरची बे भाव विक्री करावी लागत आहे. धाड परिसरातील बरेच गाव मिरची लागवडीसाठी प्रसिद्ध असल्याने दरवर्षी परिसरात उन्हाळी मिरची लागवड होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी मिरची लागवडीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देतात परंतु ऐन तोडणीच्या वेळेवर मिरचीचा चार पटीने भावात घसरन झाल्याने मिरची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे.
▪️मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव
धाड परिसरातील मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिर्ची उपटून फेकली. दरम्यान मिरचीचा दर कोसळला आहे.