लाडली बहीण पहिले अर्ज करण्यासाठी तर आता kyc साठी रांगेत
Kyc साठी एकच काउंटर फक्त तिनच दिवस सुरू महिलांसाठी वेगळे काउंटर सुरू करण्याची मागणी

लोणार :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी प्रतिनिधी यासीन शेख :- सध्या राज्य सरकारने लाडली बहीण योजना जाहीर केल्याने बहिणीला दिवस भर बॅकेच्या रांगेत उभ्ये राहावे लागत आहे.सरकारने योजना जाहीर केल्याने बहुतेक बहिणीच्या खाते बऱ्याच दिवसांपासून बंद आहे त्यामध्ये व्यवहार झालेली नाही.त्यामुळे बॅकेकडून बऱ्याच खात्यांना होल्ड लागले आहे व हे ओळ काढण्यासाठी खातेधारक बँकेकडे जात आहे पण लोणार या ठिकाणी भारतीय स्टेट बँकेच्या गलथन कारभाराला बहिणीला सामोरे जावे लागत आहे.या ठिकाणी kyc व होळ काढण्यासाठी एकच काउंटर असून महिला पुरुष एकाच काउंटर गर्दी करत आहे. सदर बॅक कडून सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवस kyc सुरू असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे महिलांना दिवसभर या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागत आहे तरी तात्काळ वरिष्ठांनी दखल घेऊन काउंटर वाढून आठवडाभर केवायसी काउंटर सुरू ठेवावे अशी मागणी लाडली बहिणीकडून करण्यात येत आहे.