Homeबुलढाणा (घाटावर)

ठाकरे सेनेचा ढाण्या वाघच गद्दाराला आपली जागा दाखवू शकतो- शुभांगी ताई पाटील

Spread the love

लोणार:-आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- प्रतिनिधी यासिन शेख- ठाकरे सेनेचा ढाण्या वाघच गद्दाराला आपली जागा दाखवू शकतो असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील यांनी महाआरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी केले.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा सप्ताह समाप्ती निमित्त जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य रोगनिदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिरात त्या बोलत होत्या. गद्दारांच्या दिम तीला सगळ्यात पुढे असलेल्याला आपली जागा दाखवून देणे शिवसेनेचे आद्य कर्तव्य आहे व डॉ. बछिरे सारखा शिवसैनिक याचं उत्तर देऊ शकतो. शिवसेनेचे एक वर्षाचं पीक कापून नेले पण अस्सल बियाणं उद्धव साहेब ठाकरे यांच्या जवळ शिवसैनिकाच्या रूपाने आहे याला कोणी चोरू शकत नाही.
जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी डॉ. बछिरे यांच्या संघटन कौशल्याचा तोंड भरून कौतुक केले व शिवसेना फुटी नंतर मेहकर लोणार मतदार संघ बांधणीचं काम ज्या पद्धतीने व निर्भिकपणे डॉ. बछिरे ने केले ते कौतुकास्पद आहे त्यांनी अनेक मेळावे, अनेक शिबिर व अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या ओळखीचा ठसा उमटवला त्यातीललच एक म्हणजे हे महाआरोग्य रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिर ज्याचा सर्वसामान्य जन माणसाला फायदा होत आहे. या शिबिराचे आयोजक डॉ. गोपाल बछिरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हटले की, आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही दरवर्षी साहेबांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन करतो, आम्ही बाया नाचवत नाही, आम्ही ऑर्केस्ट्रा वाजवत नाही, आम्ही उगाच खर्च करत नाही, आम्ही समाज उपयोगी कार्य करून त्याचा समाजास लाभ देण्याचे प्रयत्न करतो वाढदिवस सप्ताह निमित्त आम्ही शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, छत्रीचे वाटप केले, रेनकोटचे वाटप केले, गोरगरिबांना ब्लॅंकेटचे वाटप केले, सरकारी दवाखान्यात फळांचे वाटप केले, अनाथांना मिठाईचे वाटप केले आणि हा सप्ताह महाआरोग्य रोगनिदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराने समाप्ती करत आहोत.
अध्यक्षीय समारोपात जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी या स्तुत्य उपक्रमाची भरभरून स्तुती केली आणि डॉ. बछीरे यांनी दरवर्षी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमांची तोंड भरून स्तुती केली या शिबिरासाठी संभाजीनगर येथील एम हॉस्पिटल, अल्पाइन हॉस्पिटल, सनशाइन हॉस्पिटल व रुणवाल हार्ट केअर हॉस्पिटल ची वेगवेगळी टीम आलेली होती या शिबिरात ५१७ रुग्णांची तपासणी झाली त्यापैकी १२८ रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याचे, नऊ हृदय शस्त्रक्रिया व अस्थिरोगाचे ४२ शस्त्रक्रियाचे ठरले आहे व संपूर्ण शस्त्रक्रिया ह्या मोफत होणार आहेत
या कार्यक्रमासाठी मेहकर विधानसभा संपर्कप्रमुख नंदलाल जाधव महिला जिल्हा संघटिका जिजाबाई राठोड, उद्योजक भास्कररावजी गारोळे, मेहकर तालुकाप्रमुख लिंबाजी पांडव, शहर प्रमुख किशोर गारोळे, लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, नगरसेविका सिंधुताई जाधव, संदीप गारोळे, श्रीकांत नागरे, परमेश्वर दहातोंडे, राजीव बुधवत, जीवन घायाळ, श्रीकांत मादनकर, लूकमान कुरेशी, इकबाल कुरेशी, नारायण बळी, रमेशबापू देशमुख एड. संदीप गवई, पोर्णिमाताई गवई, पार्वतीताई सुटे, शालिनीताई मोरे, राजू दहातोंडे, राजू जयस्वाल, डॉ. मोहसीन शेख हे मंचकावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना महिला जिल्हा संघटिका संजीवनी वाघ यांनी केले तर आभार युवा तालुका अधिकारी जीवन घायाळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page