श्री गजानन महाराज पालखीचे बिबी येथे आगमन

बिबी: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ( लखन जाधव)- श्री गजानन महाराज पालखीचे आज बिबी येथे 6: 40 मि. टनी आगमन झाला. बिबी येथे आगमन होताच गावकऱ्यांनी बँड लाऊन वाजत गाजत फटाके फोडून स्वागत केला.सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ शेगावीचा राणा ‘संत गजानन महाराज’ यांच्या पालखी दिंडीचे ४ ऑगस्ट रोजी लोणार तालुक्यात आगमन झाला आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे भव्य आगमन सोहळा झाला होता. बिबी येथे ठिकठिकाणी भाविक भक्त चहा, पोहे, नाश्ता, फराळाचे वाटप केले. तसेच या रस्त्याने गजानन महाराजांच्या पालखी स्वागताचे बॅनर ठिकठिकाणी झळकतांना दिसून आले. बिबी येथे गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य सोहळा झाला होता . वारकरी एकमेकांना आलिंगन देतात,भजन म्हणून नाचून गाऊन आपला आनंद व्यक्त केले . हरी नामाचा जयजयकार येथे केला .
अत्यंत भक्तीमय वातावरण येथे निर्माण झाला होता. बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयमध्ये भाविक भक्तांना दर्शनासाठी रांगेने उभे राहून दर्शन सोहळा कार्यक्रम पार पडला, व जेवणाची सोई गवकऱ्यानी केली होती. त्यानंतर इथेच पालखी मुक्कामी राहणारा असून सकाळी बिबी वरून ५ ऑगस्ट रोजी मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर किनगाव जट्टु , बिबखेड, धायफळ, किन्ही, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार, खामगाव मार्गे शेगाव येथे ११ ऑगस्ट रोजी पालखी पोहोचणार आहे.