Homeबुलढाणा (घाटावर)

ई पाॅस मशीन तहसील कार्यालयात केल्या जमा

Spread the love

लोणार:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी प्रतिनिधी यासीन शेख:- ईपॉस मशीनमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड व सर्वर डाऊन होत असुन त्या दुरुस्त करण्यास शासन टाळाटाळ करत आहे. याच्या निषेधार्थ लोणार तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवान कोकाटे यांच्या नेतृत्वात संघटनेच्या वतीने लोणार बस स्थानकापासून डफडे बजाओ आंदोलन करीत ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या.

 

ई-पॉस मशीनमध्ये सर्वर डाऊनसह तांत्रिक बिघाड होत आहे. या कारणामुळे तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करताना दुकानदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. धान्य उपलब्ध असताना धान्य का देत म्हणून परमिट धारकांच्या रोषाला दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे.

५ ऑगस्टपूर्वी यामध्ये सुधारणा न केल्यास ई-पॉस मशीन तहसीलला जमा करू, असा इशाराही निवेदनाद्वारे संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. मात्र, शासनाने निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज ५ ऑगस्ट रोजी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवान कोकाटे यांच्या नेतृत्वात डफडे वाजवित तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच ई-पॉस मशीन जमा करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे सचिव संजय पवार, उपाध्यक्ष डॉ. अनिल मापारी, सहसचिव रामदास तनपुरे, उपाध्यक्ष श्रीराम आघाव, कार्याध्यक्ष एम.ए.नसीम, मार्गदर्शक सतीश तेजनकर, संतोष रूणवाल यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page