गण गण गणात बोते’चा गजर…
श्रींच्या पालखीचे उल्का नगरी लोणार शहरात उत्साहात स्वागत

लोणार:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी प्रतिनिधी यासीन शेख:- गण गण गणात बोते’ चा गजर, टाळ- मृदुंगाचा निनाद, विठू माऊलीचा जयघोष, भगव्या पताका अन शिस्तबद्ध पद्धतीने चालणारे वारकरी अश्या थाटा अन दिमाखात विदर्भ पंढरी शेगाव येथील गजानन महाराजांची पालखीचे आज उल्का नगरी लोणार सरोवर परिसरात आगमन झाले. पालखीच्या स्वागत व दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी जमल्याचे दिसून आले.आषाढी वारीवर गेलेली पालखी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ५ ऑगस्ट सोमवारी लोणार येथे आगमन झाले. विविध पक्ष,सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविकांच्या वतीने पालखीचे पारंपारीक उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी फराळाची सुविधा करण्यात आली होती. दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय लोणार येथे विसावा घेणार आहे येथेच भाविकांना संत गजानन महाराज यांच्या दर्शनाचा सोहळा अनुभवता येईल व याच ठिकाणी वारकऱ्यांचे रात्रीची मुक्कामाची सोय करण्यात आली आहे.मंगळवारी पहाटे पालखी सुलतानपूर मार्गे मेहकर कडे प्रस्थान करणार आहे.