शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा…
गायत्री शिंगणे विरोधात आ राजेंद्र शिंगणे अस राजकीय चित्र...

सिंदखेड राजा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी प्रतिनिधी : प्रतीक सोनपसारे:- सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात भ्व्य् मोर्चा काढण्यात आला.
पिक विमा मिळावा, पिक कर्ज , नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन आज हामोरचा काढण्यात आला.गेल्या 25 वर्षांपासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे आमदार म्हणून् निवडून येत आहेत मात्र अद्याप पर्यंत या सिंदखेडराजा तालुक्याचा कुठलाही विकास झाला नाही.. हा विकास व्हावा यासाठी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी त्यांच्या विरोधात उभी राहिली असून शरद पवार गटाच्या जिल्ह्याच्या कार्यध्यक्षा गायत्री शिंगणे यांनी रणशिंग फुकले आहे.गायत्री शिंगणे यांचे सक्खे काका अजित पवार गटाचे आ राजेंद्र शिंगणे यांच्यात विरोधात पुढील काळात राजकारण होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात ही लढत चांगल्याच प्रकारे होणार असल्याचे दिसून येत आहे.