Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

शासकीय जमीन कसनाऱ्यांच्या नावे करा :- नरहरी गवई

Spread the love

 

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील भुमीहीन अनुचित जाती व जमाती की ज्यांच्याकडे स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे व सरकारने या भुमीहीन अनुसुचित जाती, जमाती, या प्रवर्गाकडे जाणिवपूर्वक लक्ष न दिल्याने व त्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे आम्ही शासनाच्या विना वापर पडून असलेल्या पडीक जमीनी लागवडीखाली आनल्या असुन त्या जमीनीच्या भरोषावर आमच्या परीवाराचा चरितार्थ चालवत आहेत, आम्ही या शेतीच्या भरोषावर जीवन जगत असताना शासनाने आम्हाला अंधारात ठेऊन आमच्या ताब्यात असलेल्या वहीती व उभे पीक असुन बसल्या ठिकाणी पंचनामा करूण वहीती उभे पीक असलेली जमीन पडीक दावण्याच धाडस महसूल अधिकारी यांनी बेजबाबदार पणे दाखवली आहे. असा खोटा अहवाल देणाऱ्या मंडळधिरी, तलाठी यांच्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले बुलढाणा जिल्हाधक्ष मा. नरहरी दादा गवई यांनी व्यक्त केला आहे. मागील अधिवेशनात मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की शासकीय जमीन ही कसनाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी वन जमीन 4 हेक्टर पर्यंतच्या वन जमीन ताब्यात असलेल्या जमीनी कसनाऱ्यांच्या नावे करूण 7/12 सदरी कसनाऱ्यांचे नाव लावावे, व गायरान शासकीय जमीन कसनाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी, असी घोषना केली असता महसुल विभागाकडुन मात्र केराची टोपली दाखवली जात आहे असे उदगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे युवक कार्याध्यक्ष आमपाल भाऊ वाघमारे यांनी बोलताना सांगितले आहे

गोर गरीबाना उपजिकेची साधण पुरवण्याच काम सरकारचे असुन सरकारने आमच्या गरजाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ना ईलाजास्तंव आम्हाला शासनाच्या जमीनी ताब्यात घेऊन उपजिवीके करावी लागत आहे. सरकारने भुमीहीन असुचित जाती व जमाती च्या लोकांच्या ताब्यात असलेल्या जमीनी त्यांना देण्याऐवजी त्या जमीनी सौरऊर्जा प्रकल्पासाठी एक रूपैया नाममात्र दराने देण्याचे घाट सरकारने रचला आहे. आम्ही गरीब सरकारला विनंती करतो की कंपनी तुम्हाला एक रुपया नाममात्र भांड देत असेल तर आम्ही तुम्हाला 10 रू भाडे देण्यास तयार आहोत असा सल्ला युवक कार्याध्यक्ष आम्रपाल भाऊ वाघमारे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही आमच्या ताब्यात असलेल्या जमीनी सौरऊर्जा कंपनीला देणार नाही असा सज्जड दम रिपाइं जिल्हाध्यक्ष नरहरी दादा गवई यांनी सरकारला भरला आहे. यावेळी अमोल भालेराव, जगनाथ वाकोडे, मधुकर ठाकरे, जिजाबाई गवई, सुबिद्राबाई वाकोडे, रत्ना गवई, इत्यादी या मागणीसाठी उपोषण करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page